News Flash

रोहित मला ‘हजबंड हँडबुक’ सोबत तुझे ‘डबल हंड्रेड’ हँडबुकही दे- विराट कोहली

रोहित शर्मा याने केलेले एक मजेशीर ट्विट चांगलेच गाजले होते.

Virat Kohli : विराटने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली असल्याने रोहितवर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

सध्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अनुष्कासोबत हनिमून एन्जॉय करत असला तरी गेल्या काही दिवसांमध्ये घडून गेलेल्या गोष्टींवर त्याचे लक्ष आहे. विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केले होते. त्यानंतर या दोघांना अनेक क्रिकेटपटून आणि टीम इंडियातील सहकाऱ्यांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी रोहित शर्मा याने केलेले एक मजेशीर ट्विट चांगलेच गाजले होते. रोहितने नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा देताना भावी आयुष्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. ‘विराट मी तुला हजबंड हँडबुक देईन. अनुष्का तुझे आडनाव बदलू नकोस, असे रोहितने या ट्विटमध्ये म्हटले होते.

Next Stories
1 अ‍ॅशेस पुन्हा ऑस्ट्रेलियाकडे
2 ब्राझीलचा ‘काका’ निवृत्त
3 रोहित शर्मा पाचव्या स्थानी
Just Now!
X