भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 2018 सालच्या आयसीसी पुरस्कारांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार, सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटीपटू असे मानाचे तिन्ही पुरस्कार विराट कोहलीने आपल्या खिशात घातले आहेत. विराटने 2018 सालात वन-डे क्रिकेटमध्ये 133.55 च्या सरासरीने 1 हजार 202 धावा काढल्या आहेत. यामध्ये सहा शतकं आणि 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. एकाच वर्षात आयसीसीचे मानाचे तिन्ही पुरस्कार पटकावणारा विराट पहिला खेळाडू ठरला आहे.

याचसोबत विराट कोहलीने 2018 वर्षात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद 10 हजार धावांचा विक्रमही कोहलीने आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी आणि वन-डे मालिकेमध्ये भारताला विजय मिळवून देण्यातही विराट कोहली यशस्वी ठरला आहे. आयसीसीच्या कसोटी आणि वन-डे संघाचंही विराट कोहलीने कर्णधारपद मिळवलं असून यंदाच्या वर्ष हे विराटसाठी खऱ्या अर्थाने चांगलं ठरलं आहे.

अवश्य वाचा – ICCच्या Team of the Year वर किंग कोहलीचा दबदबा