04 March 2021

News Flash

वर्षांतील सर्वोत्तम कसोटी कर्णधार पुरस्कार कोहलीला

इंग्लंडच्या बेन स्टोक्सने सर्वोत्तम कसोटी फलंदाजाचा पुरस्कार पटकावला आहे.

| February 28, 2017 01:30 am

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला १०व्या ईएसपीएन-क्रिकइन्फो वार्षिक पुरस्कारांमध्ये वर्षांतील सर्वोत्तम कर्णधार या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मागील वर्षांत कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताने १२ कसोटी सामन्यांपैकी ९ सामने जिंकण्याची किमया साधली.

इंग्लंडच्या बेन स्टोक्सने सर्वोत्तम कसोटी फलंदाजाचा पुरस्कार पटकावला आहे. केप टाऊनमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९८ चेंडूंत २५८ धावांची खेळी साकारली होती. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने तिसऱ्या कसोटीत १७ धावांत ६ बळी घेतले आणि मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने सर्वोत्तम कसोटी गोलंदाजाचा पुरस्कार मिळवला.

दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७८ धावांची खेळी साकारली. त्याची सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज या पुरस्कारासाठी निवड झाली आहे, तर वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरिन सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाज ठरला आहे.

विंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटने सर्वोत्तम ट्वेन्टी-२० फलंदाजाचे आणि बांगलादेशच्या मुस्ताफिझूर रेहमानने सर्वोत्तम ट्वेन्टी-२० गोलंदाजाच्या पुरस्कारावर दावा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 1:30 am

Web Title: virat kohli best captain 2016 indian team
Next Stories
1 ISSF shooting World Cup : जितू राय आणि हिना सिंधुला १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्णपदक
2 स्मिथच्या संघाने भारताचा डाव उलटवला!
3 हरिकाला कांस्यपदकावर समाधान
Just Now!
X