जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे बिरुद मिरवणाऱ्या गुजरातच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे. गुलाबी चेंडूने सामना खेळवण्यात येणार आहे. या लढतीसाठी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना उत्तम साथ देईल. तसेच वेगवान गोलंदाजांचीही भूमिका महत्त्वाची असेल असा दावा भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. याच दरम्यान तिसऱ्या कसोटीच्या आधी विराट कोहली गोलंदाजीचा सराव करताना दिसल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

मोटेराच्या स्टेडियमवर रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव गोलंदाजीचा सराव करत होते. गुलाबी चेंडूने खेळण्याचा भारतीय संघाला फारसा अनुभव नसल्याने सारेच खेळाडू मैदानावर घाम गाळताना दिसत होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहली याने सराव सत्रादरम्यान गोलंदाजी केली. ICCने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. “अशी कोणती गोष्ट शिल्लक राहिली आहे का जी विराटला शक्य नाही”, असा मजेशीर सवाल या व्हिडीओसोबत ICCने पोस्ट केला.