News Flash

कोहलीने धोनीचा विक्रम मोडला, आता विश्वविक्रमापासून एक पाऊल दूर

विराटच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तूरा

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदाच बाहेरच्या मैदानावर विरोधी संघाला ३-० अशी क्लिन स्वीप दिली. तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना तिसऱ्या दिवशी जिंकून भारताने मालिका खिशात घातली. या विजयानंतर यशस्वी कर्णधार म्हणून विराटच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तूरा खोवला गेलाय. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत भारताच्या बाहेर १३ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात ७ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ३० कसोटी सामन्यात ६ विजय मिळवले होते.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातच विराटने धोनीची बरोबरी केली. त्यानंतर अखेरचा आणि तिसरा कसोटी सामना जिंकत कोहली धोनीच्या एक पाऊल पुढे निघून गेला. परदेशी मैदानात सर्वाधिक विजय मिळवून देण्याचा पराक्रम सौरभ गांगुलीच्या नावावर आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ११ कसोटी सामने जिंकले आहेत. विराट कोहली गांगुलीच्या विक्रमापासून आणखी पाच पावले दूर असला तरी भारताच्या कसोटी क्रिकेटच्या ८५ वर्षांच्या इतिहासात भारतीय संघाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. कोहलीने २९ व्या कसोटीत नेतृत्व करताना हा पराक्रम केला. सीके नायडू यांच्या नेतृत्वाखाली लॉर्डच्या मैदानावरुन भारतीय संघाने कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. तेव्हापासून आतापर्यंत ३३ जणांनी भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व केल. पण केवळ कोहलीच्या नेतृत्वाखालीच भारताने प्रतिस्पर्धी संघांना ३-० अशी क्लिन स्वीप दिली.

यापूर्वी २००४ आणि २००५ मध्ये भारतीय संघाने परदेशी मैदानात क्लिन स्वीप देण्याचा पराक्रम केला. बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यासोबत भारताने मालिका जिंकली. पण ही मालिका २ कसोटींची होती. श्रीलंकेच्या मैदानात विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत मालिकेत ३-० असा विजयी मिळवला. भारतीय संघ सलग मालिका विजयाच्या विश्व विक्रमापासून एक पाऊल दूर आहे.  रिकी पॉन्टिगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने सलग ९ वेळा मालिका विजय मिळवले आहेत. कोहली हा पराक्रम करणार का? हे येणारा काळच ठरवेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 6:37 pm

Web Title: virat kohli breaks ms dhoni record of second highest win in test cricket on foreign soil only sourav ganguly ahead india vs srilanka
Next Stories
1 श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय, ‘हे’ १२ विक्रम भारताच्या नावावर !
2 पांड्याने कर्णधार कोहलीलाही मागे टाकले
3 संघात निवड न झाल्याने अश्विनचा ‘या’ संघाकडून खेळण्याचा निर्णय