लॉकडाउनमध्ये प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या भारतीय संघाने अखेरीस आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याला सुरुवात केली आहे. सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या वन-डे सामन्याला सुरुवात झाली आहे. दुखापतींनी ग्रासलेल्या टीम इंडियाला कसोटी मालिका विराटविना खेळावी लागणार आहे. विराट पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर भारतात परतणार आहे.

अवश्य वाचा – रोहित आमच्यासोबत का नाही याचं कारण मलाही माहिती नाही – विराट कोहली

बाळंतपणात आपली पत्नी अनुष्काची काळजी घेण्यासाठी विराटने हा निर्णय घेतला असून बीसीसीआयनेही यासाठी त्याला सुट्टी मंजूर केली आहे. पहिल्या सामन्याआधी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलत असताना विराट कोहलीने आपल्या या निर्णयाबद्दल माहिती दिली. “निवड समितीची बैठक होण्याआधी मी माझ्या निर्णयाबद्दल माहिती दिली होती. ऑस्ट्रेलिया आणि भारतात दोन्ही ठिकाणी आम्हाला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागेल हा विचार करुनच आम्ही निर्णय घेतला होता. माझ्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी मला अनुष्कासोबत असणं गरजेचं वाटतं.”

अवश्य वाचा – BLOG : रोहितची दुखापत आणि BCCI चा कम्युनिकेशन एरर

माझ्यासाठी हा अत्यंत खास आणि आनंद देणारा क्षण आहे. बाबा म्हणून मुलाच्या जन्मावेळचा आनंद मला गमवायचा नाहीये. म्हणूनच मी पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचं विराट कोहलीने स्पष्ट केलं.