01 March 2021

News Flash

कर्णधार म्हणून विराटने अद्याप काहीही साध्य केलं नाही – गौतम गंभीर

विराटला अजुन बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत

महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे आलं. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या काही वर्षांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मैदानात आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या विराटने आतापर्यंत भारतीय संघाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. या दरम्यान विराटने फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला. मात्र भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरच्यामते विराट कोहलीने कर्णधार म्हणून अद्याप काहीही साध्य केलं नाही.

विराटची गेल्या काही दिवसांमधली कामगिरी नक्कीच वाखणण्याजोगी असली तरीही विराट भारतीय संघाला आयसीसीच्या एकाही महत्वाच्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. याबद्दल बोलत असताना गंभीर म्हणाला, “तुम्ही स्वतःसाठी धावा काढणं सुरु ठेवू शकता. भरपूर धावा करुनही संघाला महत्वाची स्पर्धा जिंकवून न देऊ शकलेले अनेक खेळाडू तुम्हाला सापडतील. सध्याच्या घडीला विराट कोहलीनेही कर्णधार म्हणून अद्याप काहीही साध्य केलेलं नाही, त्याला खूप शिकायची गरज आहे. तो धावा काढेल, शतकं ठोकेल हे सर्व सुरु राहिलं. पण क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही कर्णधार म्हणून महत्वाच्या स्पर्धा जिंकत नाहीत, तर तुमच्या कारकिर्दीला फारसा अर्थ उरत नाही.” गौतम Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

दरम्यान, करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका भारतात क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामासह सर्व महत्वाच्या स्थानिक स्पर्धा स्थगित केल्या आहेत. क्रिकेटची रखडलेली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न बीसीसीआय करत असलं तरीही येत्या काही महिन्यांमध्ये क्रिकेटचे सामने सुरु होण्याची शक्यता कमी दिसत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बीसीसीआय आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्याच्या विचारात आहे. पण यासाठी टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसी नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 6:53 pm

Web Title: virat kohli can keep scoring runs but he has won nothing as leader says gautam gambhir psd 91
Next Stories
1 क्रिकेट मालिका आणि ICC च्या स्पर्धा यांच्यात ‘हा’ फरक – गंभीर
2 सुशांतच्या मृत्यूवर शोएब अख्तर म्हणतो…
3 हे U-19 नाहीये, मार ना ! जेव्हा हार्दिक पांड्या शुभमन गिलला स्लेजिंग करतो
Just Now!
X