25 February 2021

News Flash

विराटने केलं इंग्लंडला धूळ चारणाऱ्या वेस्ट इंडिजचं कौतुक, म्हणाला…

ब्लॅकवूडने केली ९५ धावांची दमदार खेळी

ENG vs WI 1st Test : करोनाने ठप्प असलेले आतंरराष्ट्रीय क्रिकेट अखेर इंग्लंडमध्ये सुरू झाले. वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी यजमानांवर ४ गडी राखून विजय मिळवला. २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्लॅकवूडने धडाकेबाज ९५ धावांची खेळी केली. या विजयासह वेस्ट इंडिजने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली. पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी टिपणाऱ्या गॅब्रियलला सामनावीराचा किताब मिळाला.

ICC ने आयोजित केलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत वेस्ट इंडिजने आपला विजय कसोटी विजय नोंदवला. त्यामुळे ४० गुणांसह त्यांनी गुणतालिकेत आपले खाते उघडले. दक्षिण आफ्रिकेचे २४ गुण असल्याने वेस्ट इंडिजने या विजयासह त्यांना ‘ओव्हरटेक’ केलं. इंग्लंडला धूळ चारणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाचं भारतीय कर्णधार विराट कोहलीने कोतुक केलं. “अरे व्वा! वेस्ट इंडिज, तुम्ही खूप छान विजय मिळवलात. हा सामना म्हणजे कसोटी क्रिकेट कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण होता”, असं ट्विट विराटने केलं.

वेस्ट इंडिजचा इंग्लंडला दणका

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात २०४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे वेस्ट इंडिजकडे पहिल्या डावाअखेरीस शतकी आघाडी होती. त्यानंतर इंग्लडंच्या दुसऱ्या डावात सिबलीने (५०) अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर क्राव्हलीने डाव सांभाळत स्टोक्सला साथ दिली आणि ९८ धावांची भागीदारी केली. क्राव्हलीने ७६ तर स्टोक्सने ४६ धावा केल्या. पण इतर फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे इंग्लंडला ३१३ धावाच करता आल्या.

शेवटच्या दिवशी २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने झटपट तीन गडी गमावले. जॉन कॅम्पबेलही एका धावेवर खेळत असताना रिटायर्ड होत तंबूत परतला. पण त्यानंतर रॉस्टन चेस आणि जेरमाईन ब्लॅकवूड या दोघांनी दमदार खेळी केली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी केली. ब्लॅकवूड ९५ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार होल्डरने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 5:17 pm

Web Title: virat kohli congratulates west indies after winning test against england as international cricket returns after covid 19 vjb 91
Next Stories
1 Video : अँडरसनच्या ‘त्या’ कृत्यामुळे फुटलं वादाला तोंड
2 “धोनीसोबत रूम शेअर करताना आम्हाला जमिनीवर झोपावं लागलं”
3 ….तर देवही तुमची मदत करु शकत नाही ! – सुब्रमण्यम बद्रीनाथ
Just Now!
X