06 August 2020

News Flash

बांगलादेश दौऱ्यात विराट कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता

निवड समिती सुत्रांची माहिती

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी सामना खेळतो आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आफ्रिका दौऱ्यानंतर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. २४ ऑक्टोबरला बीसीसीआयची निवड समिती भारताच्या टी-२० आणि कसोटी संघाची निवड करणार आहे. बांगलादेशविरुद्ध भारत ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.

बांगलादेशविरुद्ध मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता विराटवर क्रिकेटचा अतिताण येऊ नये यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. निवड समितीमधील सुत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. मात्र कोणताही निर्णय घेण्याआधी निवड समिती विराटशी चर्चा करेल असंही सुत्रांनी स्पष्ट केली. ३ नोव्हेंबरपासून भारत बांगलादेशविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 8:19 pm

Web Title: virat kohli could be rested from t20i series against bangladesh psd 91
टॅग Bcci,Virat Kohli
Next Stories
1 IND vs SA : शतकवीर रोहितने केली ‘क्रिकेटच्या देवा’च्या विक्रमाशी बरोबरी
2 Video : याला म्हणतात आत्मविश्वास ! पावसाची चाहूल लागताच षटकार ठोकून हिटमॅनचं शतक
3 IND vs SA : पुन्हा दिसला रोहितचा ‘हिटमॅन’ अवतार, केला ‘हा’ नवा विक्रम
Just Now!
X