News Flash

ट्विटरवर विराट कोहलीचे ५० लाख फॉलोअर्स!

भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने शुक्रवारी ट्विटरवर ५० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला.

| January 2, 2015 07:23 am

भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने शुक्रवारी ट्विटरवर ५० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला. नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी ट्विटरवर विराटला फॉलो करणाऱ्यांची संख्या ५००४५४४वर पोहचली. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या क्रिकेट खेळाडुंच्या पंक्तीत विराट कोहलीला स्थान मिळाल्यानंतर त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले. फॉलोअर्सच्याबाबतीत विराटने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. सध्या ट्विटरवर सचिनचे ४९,१०,४९८ फॉलोअर्स आहेत. गेल्या तीन महिन्यांत विराट कोहलीच्या ट्विटरवरील लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये त्याच्या फॉलोअर्सच्या संख्येत १० लाखांची भर पडली आहे.

ट्विटरवर ४० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केल्यानंतरचे विराटचे ट्विट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 7:23 am

Web Title: virat kohli crosses 5 million mark on twitter
Next Stories
1 चौथ्या कसोटीत अक्षर, रैनाला संधी मिळणार
2 भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांबरोबर चहापान
3 रहाणे, अश्विन उपकर्णधारपदाच्या शर्यतीत
Just Now!
X