06 December 2019

News Flash

विराट कोहली सर्वोत्तम खेळाडू, इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून प्रशंसा

विराटचं सातत्य वाखणण्याजोगं !

इंग्लंडचे माजी कर्णधार माईक गॅटींग यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची स्तुती केली आहे. मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आले असताना, ते पत्रकारांशी बोलत होते.

अवश्य वाचा – Ind vs WI : पावसाने सामना थांबवला, विराटने गेलसोबत मैदानातच ठेका धरला

“केन विल्यमसन चांगला खेळाडू आहे. स्टिव्ह स्मिथनेही आपल्या कारकिर्दीत स्वतःला सिद्ध करुन दाखवलं आहे. मात्र तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराट कोहली सध्या ज्या सातत्याने खेळत आहे ते पाहता तो सर्वोत्तम खेळाडू म्हणून लायक ठरतो यात काहीच शंका नाही. तुम्हाला सर्वोत्तम खेळाडू बनायचं असेल तर तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. विराट आता ज्या प्रकारे खेळतोय, त्याच्यासारखा खेळ फार कमी खेळाडूंना जमलाय.” गॅटींग यांनी विराटच्या खेळीचं कौतुक केलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध नुकतीच टी-२० सामन्यांची मालिका जिंकली आहे. पहिल्या वन-डे सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना रद्द करावा लागला. त्यामुळे उरलेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First Published on August 9, 2019 10:27 am

Web Title: virat kohli deserves tag of a great player without a doubt says mike gatting psd 91
टॅग Virat Kohli
Just Now!
X