News Flash

विराट कोहलीच्या व्हिडीओ मेसेजवर भडकले नेटीझन्स; चाहत्यांनी दिला सपोर्ट

माझ्या सणावेळी ज्ञान द्यायचं बंद करा, विराटवर चाहते भडकले

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना शुभेच्छा देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पण या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर विराट आणि अनुष्कावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. नेटकऱ्यांनी विराटला या व्हिडीओवरुन ट्रोल केलं तर चाहत्यांनी सपोर्ट दिला आहे.

विराटने थेट ऑस्ट्रेलियामधून आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. १८ सेकंदाच्या या व्हिडीओत विराट कोहली म्हणतोय की, ” हा सण तुमच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समाधान घेऊन येवो. लक्षात ठेवा फटके फोडू नका…निसर्गाचं संरक्षण करणं ही देखील आपली जबाबदारी आहे. साधारण दिवे आणि मिळाईसह कुटुंबासोबतच दिवाळी साजरी करा. देव तुमचं कल्याण करो! स्वत:ची काळजी घ्या!”

विराट कोहलीचा व्हिडीओ मेसेज –

विराट कोहलीच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर नेटकरी आणि चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांनी विराटला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र, चाहते सपोर्ट करताना दिसत आहेत. विराट कोहलीनं दिवाळीनिमित्त दिलेला मेसेज अनेकांना आवडला नाही. विराट कोहलीला ट्रोल केलं जाते असल्याचं पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर #IStandWithVirat ही मोहिम राबवली आहे. दुसरीकडे #अनुष्का_अपना_कुत्ता_संभाल आणि अनुष्का असे दोन ट्रेंड सध्या ट्विटरवर सुरु आहेत. व्हिडिओ मेसेजनंतर नेटकऱ्यांनी विराट कोहली- अनुष्का यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे.

विराट कोहलीनं दिवाळीनिमित्त दिलेला संदेश काही नवीन नाही. पर्यवण आणि स्वास्थ व्यवस्थित राहावं त्यामुळे देशात आणि अनेक राज्यांमध्ये फटाक्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्या राज्यांना सूट मिळाली आहे तिथेही नियम आणि अटी लागू आहेत. पण ट्विटरवर नेटकरी आपली नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांपूर्वी वाढदिवसाला फटाखे फोडले तेव्हा कुठे गेला होता हा मेसेज असा सवा काहींनी विराट कोहलीला विचारला आहे.

सोनिका शर्मा या युझर्सनं म्हटलेय की, ‘माझ्या सणावेळी ज्ञान द्यायचं बंद करा, माझा सण म्हणजे तुमचं समाज जागृती मोहिम नाही.’ अन्य एक युजर निशिथ सरन लिहतो की, ‘तुम्ही क्रिकेट खेळता, आम्ही तुम्हाला प्रेम करतो. पण तुम्ही सामाजिक, धार्मिक किंवा हिंदूंचा सल्लागार होण्याची चूक कधी करु नका.’

विराट कोहलीला ट्रोल करताना काहींनी त्याची लाइफस्टाइन, गाड्या आणि विमानबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावेळी पर्यावरणाच्या बाबतीत का विचार करत नाही? असा प्रश्नही विचारला आहे. एकीकडे विराट कोहलीला ट्रोल केलं जात असताना चाहते मात्र सपोर्ट करत आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. विराट कोहली या दौऱ्यात पहिला कसोटी सामना संपल्यानंतर मायदेशी परतणार आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी विराटला बीसीसीआयने रजा मंजूर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 9:34 am

Web Title: virat kohli diwali massage troll fans austrela tour nck 90
Next Stories
1 फटाके फोडू नका ! विराटने थेट ऑस्ट्रेलियावरुन दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा
2 आखूड टप्प्याच्या चेंडूंबाबत निर्धास्त!
3 सुआरेझमुळे उरुग्वेचा विजय
Just Now!
X