News Flash

अनुष्काच्या फोटोवर विराटने केली ‘ही’ कमेंट

सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करायला 'विरूष्का' कधीच लाजत नाहीत...

देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली घरात आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत घरातच आहे. जवळपास दोन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे सारेच कंटाळले आहेत, पण करोनाचा फैलाव रोखण्यासाठी घराबाहेर न पडणे तितकेच गरजेचे आहे.

विराट आणि अनुष्का ही जोडी कायम त्यांच्या एकमेकांवरील प्रेमामुळे कायम चर्चेत असते. चाहत्यांच्या गराड्यात असो किंवा सोशल मीडियावर असो, दोघेही एकमेकांवर असलेले प्रेम मुक्तपणे व्यक्त करतात. नुकताच असा एक प्रेमळ प्रसंग घडला. अनुष्काने तिचा एक छानसा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यात लिहिले की आता मला घराचा कोपरा अन् कोपरा माहिती झाला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला. त्यात विराटनेही आपल्या सौंदर्यवती पत्नीची स्तुती करण्याची संधी सोडली नाही. त्या फोटोवर लावण्यवती (Gorgeous) अशी कमेंट करत त्याने तिच्यावरील प्रेम नव्याने व्यक्त केले.

दरम्यान, मध्यंतरी अनुष्का शर्माने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती विचित्र आवाजात ‘कोहली, चौका मार ना…’ असं ओरडत होती. त्यानंतर कोहलीला चौकार मारण्याची खरी संधीही मिळाली. ट्विटरवर एक व्हिडीओ एका चाहत्याने पोस्ट केली. त्यात लॉकडाउनमुळे घरात असलेले विरूष्का अखेर त्यांच्या इमारतीच्या आवारात क्रिकेट खेळताना दिसले होते. त्याचा एक व्हिडीओ जवळच्या इमारतीत राहणाऱ्या एका चाहत्याने शूट केला आणि ट्विट केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 3:25 pm

Web Title: virat kohli drops a lovely comment on wife anushka sharma sun kissed instagram post vjb 91
Next Stories
1 Video : Ball of the Century! पाहा शेन वॉर्नचा भन्नाट स्पिन
2 पुन्हा क्रिकेटचा थरार! ५०० प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार टी २० स्पर्धा
3 मानव जातीच्या पापांचा घडा भरतोय – कुस्तीपटू गीता फोगाट
Just Now!
X