19 September 2019

News Flash

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ११ वर्षांच्या प्रवासाबद्दल विराट म्हणतो…

चाहत्यांसाठी लिहिला भावनिक संदेश

भारताचा कर्णधार विराट कोहली याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ ऑगस्ट २०१९ ला ११ वर्षे पूर्ण झाली. या ११ वर्षात दमदार कामगिरी करत तो आता टीम इंडियाचा अविभाज्य घटक बनला आहे. या खास प्रसंगी त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मिडीयाच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे चाहत्यांचे प्रेम आणि ११ वर्षांची कारकिर्द या दोनही गोष्टींनी भारावून गेलेल्या विराटने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट केली. त्यात त्याने ‘देवाचे मला इतके आशीर्वाद मिळतील असे वाटलं नव्हतं’ अशा आशयाचा संदेश लिहिला.

विराट सध्या भारतीय संघाबरोबर विंडिज दौऱ्यावर आहे. टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता २२ ऑगस्टपासून भारत-विंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे विराटने व्यक्त होण्यासाठी सोशल मिडीयाचा मार्ग निवडला. २००८ साली तरूण मुलगा म्हणून सुरूवात केल्यापासून ते ११ वर्षांच्या कारकिर्दीत मला देवाचे इतके आशीर्वाद आणि प्रेम मिळेल असं वाटलं नव्हतं. तुम्हां साऱ्यांनाही तुमची स्वत्न सत्यात उतरवण्यासाठी बळ मिळो आणि तुम्हालाही योग्य मार्गदर्शन लाभो, अशा शब्दात विराटने भावनिक संदेश पोस्ट केला आहे.

विराट कोहलीने श्रीलंकेच्या संघाविरूद्ध १८ ऑगस्ट २००८ ला दांबुला येथे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात केली. आणि ११ वर्षात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सध्या सुरू असलेल्या विंडिज दौऱ्यातील टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे. याशिवाय कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

First Published on August 19, 2019 10:09 am

Web Title: virat kohli emotional message heartfelt post 11 years international cricket vjb 91