भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळवला. ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६४ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलचे पाच बळी आणि रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादवची त्याला मिळालेली साथ यांच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला. सामन्यात आठ बळी घेणारा आणि दमदार शतक झळकावणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर ठरला. या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

IND vs ENG: अश्विनच्या धडाकेबाज कामगिरीवर गावसकर म्हणतात…

भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका २-१ ने जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावले होते. पण इंग्लंडविरूद्ध पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. असे असताना दुसऱ्या सामन्यात रोहितचे दीडशतक, अश्विनचे शतक, विराट-रहाणे-पंतची झुंजार अर्धशतके आणि अश्विन-अक्षर-कुलदीपची फिरकी यांच्या बळावर भारताने दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केले. याचसोबत विराटने घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून २१ कसोटी विजय मिळवले. धोनीनेदेखील आपल्या कारकिर्दीत मायदेशात २१ कसोटी विजय मिळवले होते. त्या पराक्रमाशी विराटने बरोबरी केली.

Ind vs Eng Video : पंतचे सुपर-स्टंपिंग! फलंदाजाच्या पायामधून पटकन अंगावर आला चेंडू अन्…

इंग्लंडविरूद्ध पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीवर पहिल्या दिवसापासूनच वर्चस्व राखले. पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला १३४ धावांत गुंडाळून १९५ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात २८६ धावा करत इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १६४ धावांवर आटोपला.