भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमध्ये RCB संघाचं प्रतिनिधीत्व करतो. आतापर्यंत RCB ला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषक आयसीसीने वर्षभरासाठी पुढे ढकलल्यामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी सुरु केली आहे. १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात आयपीएलचं आयोजन दुबईत होणार असल्याचं गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनीह काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

अवश्य वाचा – भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी IPL ची घोषणा लवकरच – BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची माहिती

RCB चा कर्णधार विराट कोहलीही या हंगामासाठी सज्ज झाला आहे. तब्बल ५ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या विराटने आयपीएलच्या तयारीसीठी खास किट मागवला आहे. विराटने आपल्या नव्या किटचा फोटो सोशल मीडिया स्टोरीजमध्ये टाकत आपण सज्ज असल्याचं सांगितलंय.

आयपीएलचा यंदाचा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार होतं. हे टाळण्यासाठी बीसीसीआयने स्पर्धेच्या आयोजनाची तयारी केली होती. युएईमध्ये आयपीएलचं आयोजन पार पडल्यानंतर भारतीय संघ तिकडूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होणार आहे.

अवश्य वाचा – नाव मोठं लक्षण खोटं : BCCI कडून १० महिन्यांपासून भारतीय खेळाडूंना मानधनच नाही