News Flash

इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने घेतली करोनाची लस

विराटव्यतिरिक्त इशांत शर्मानेही पत्नीसह केले लसीकरण

विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने करोनाची लस टोचून घेतली आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने ही लस घेतली. विराटने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लस घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. कृपया लस घ्या, सुरक्षित राहा, असे विराटने सांगितले.

विराट कोहली

 

विराटव्यतिरिक्त टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या पत्नीसह करोनाची लस घेतली. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत करोनायोद्ध्यांचे आभार मानले आहेत. याआधी संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनीही करोनाची लस घेतल्याचे सांगितले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishant Sharma (@ishant.sharma29)

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून मध्यातच माघार घेणारा रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांसह अनेक खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

 

साऊदम्पटन येथे १८ ते २२ जूनदरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत रंगणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने ही संघनिवड केली. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना भारतीय संघात स्थान लाभलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 1:48 pm

Web Title: virat kohli gets vaccinated for covid 19 ahead of england tour adn 96
Next Stories
1 क्रिकेटविश्वातून अजून एक दु:खद बातमी, फिरकीपटू पीयूष चावलाच्या वडिलांचे निधन
2 IPLमध्ये भाग घेतलेले विंडीजचे खेळाडू सुखरूप घरी पोहोचले
3 “माझ्याशी लग्न करशील?”, राजस्थान रॉयल्सच्या राहुल तेवतियाने सर्वांसमोर केले प्रपोज!
Just Now!
X