News Flash

VIDEO: कोहलीने स्वत:चा पुरस्कार चाहत्याला दिला!

बंगळुरूचं स्पर्धेतील आव्हान याआधीच संपुष्टात आलं आहे.

अखेरचा सामना जिंकून बंगळुरूने शेवट गोड केला.

आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील अखेरच्या साखळी सामन्यात विराट कोहलीचा दिलदारपणा पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला ‘स्टायलिश प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला. यावेळी कोहलीने त्याला मिळालेला पुरस्कार त्याच्या एका चाहत्याला दिला. खरंतर यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीच्या संघाची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. सततच्या पराभवानंतर कोहली निराश झाला होता. पण अखेरचा सामना जिंकून बंगळुरूने शेवट गोड केला.

सामन्याचा पुरस्कार सोहळा संपल्यानंतर विराट कोहली धावत प्रेक्षकांच्या दिशेने गेला. सीमा रेषेची रेलिंग ओलांडून विराटने त्याला मिळालेले सन्मानचिन्ह चाहत्याला दिले. कोहलीच्या या दिलदार अंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बंगळुरूचं स्पर्धेतील आव्हान याआधीच संपुष्टात आलं आहे. तर रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने यंदा चमकदार कामगिरीची नोंद करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 5:39 pm

Web Title: virat kohli gives his award away to a fan after royal challengers bangalore end ipl 2017 campaign
Next Stories
1 विश्वविक्रमी खेळी केल्याचे ‘वॉट्सअ‍ॅप’मुळे समजले-पूनम राऊत
2 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर, वेळापत्रक निश्चित
3 ..तर अ‍ॅशेस खेळणार नाही – वॉर्नर
Just Now!
X