News Flash

Video : विराटचा नवा ‘रेट्रो’ लूक पाहिलात का?

BCCIला दिलेल्या मुलाखतीत दिसला नवा लूक

सध्या देशात लॉकडाउन सुरु असल्यामुळे सामान्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटीदेखील घरीच आहेत. मात्र या काळतही अभिनेत्री अनुष्का शर्मा सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या वेबसीरिजमुळे चर्चिली जात होती. त्यानंतर ती एका फोटोशूटमधील बोल्ड लूकमुळे चर्चेत होती. या साऱ्यानंतर आता विराट कोहलीदेखील एका नव्या लूकमध्ये दिसून आला आहे.

BCCI टीव्हीच्या माध्यमातून सलामीवीर मयंक अग्रवाल हा ओपन नेट्स विथ मयंक या कार्यक्रमात विविध क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतो. या कार्यक्रमात आगामी मुलाखत कर्णधार विराट कोहलीची आहे. या मुलाखतीचा टीझर BCCI च्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला. त्यावेळी विराटचा नवा रेट्रो लूक समोर आला. मयंकने विराटच्या गॉगलची स्तुती केल्यानंतर विराटने स्वत:च रेट्रो लूकबद्दल सांगितलं.

विराट सध्या पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत घरात आहे. ते दोघेही झकासपैकी एकत्र वेळ घालवत आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यापासून विराट-अनुष्काने अनेक फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तर हे दोघे आपल्या इमारतीच्या आवारात क्रिकेट खेळतानाही दिसले होते. पण अनुष्काची सोबत असतानाही विराट एक गोष्ट मिस करतोय. विराटने एक छान निसर्गरम्य ठिकाणाचा फोटो पोस्ट करत, ‘मी विविध ठिकाणी फिरणं, भ्रमण करणं मिस करतोय’, असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 6:23 pm

Web Title: virat kohli going retro as new look revealed in bcci interview with mayank vjb 91
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 बेन स्टोक्ससारखा ऑलराऊंडर ‘टीम इंडिया’कडे असेल तर… – इरफान पठाण
2 IPL सुरू होण्याआधी ‘या’ संघाविरूद्ध खेळणार टीम इंडिया?
3 संघातून वगळल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे मिळाला आधार – गांगुली
Just Now!
X