भारतीय कर्णधार विराट कोहलीने करोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने इंग्लडविरोधातील मँचेस्टरचा सामना रद्द होणं हे दूर्देवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच सध्याच्या या कठीण कालावधीमध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये जैव सुरक्षित वातावरण म्हणजेच बायो बलल आणखीन मजबूत असेल अशी अपेक्षा व्यक्त केलीय. रॉयल चँलेंजर्स बंगळूरु म्हणजेच आरसीबीचं नेतृत्व करणाऱ्या कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांना मागील सोमवारी करोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंनी इंग्लंडविरोधातील पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला होता.

नक्की पाहा हे फोटो >> आधी घटस्फोट नंतर प्रेयसीसोबत ब्रेकअप, आता ‘बॅचलर्स’ राहण्यासाठी क्रिकेटपटूने घेतलं ७० कोटींचं घर

इंग्लंडमधील कसोटी रद्द झाल्यानंतर रविवारी विराट कोहली आणि मोहम्मद सिराज हे दोघे दुबईमध्ये दाखल झाले. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून आयपीएलचे उर्वरित पर्व सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर आरसीबीच्या डिजीटल माध्यमांवरुन संवाद साधताना कोहलीने युएई आणि ओमानमधील क्रिकेट स्पर्धा या किती आव्हानात्मक असतील याबद्दल भाष्य केलं. “हे दूर्देवी आहे की आम्हाला येथे (कसोटी रद्द झाल्याने दुबईला) लवकर यावं लागलं. मात्र करोनामुळे बऱ्याच गोष्टी अनिश्चित आहेत. अशा परिस्थितीमध्ये काहीही घडू शकतं. अपेक्षा आहे की येथे एक चांगलं, सक्षम आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यामध्ये (बायो बलल सुरक्षित ठेवण्यात) यश येईल आणि आयपीएलचं हे पर्व शानदार असेल,” अशी अपेक्षा कोहलीने व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> शास्त्री गुरुजी अन् धोनीही संघाची साथ सोडणार; विराटही देणार मोठा धक्का, टीम इंडियाचं कसं होणार?

ही स्पर्धा सध्या आरसीबीसाठी फार महत्वाची आहे तसेच नंतर भारतीय क्रिकेट संघ याच ठिकाणी टी २० विश्वचषक खेळणार असल्याने त्यांनाही ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे, असं कोहलीने म्हटलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ रविवारी उर्वरित पर्वामधील पहिला सामना येत्या रविवारी खेळवला जाणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ सोमवारी मैदानात उतरले. अनेक परदेशी खेळाडूंनी या स्पर्धेमधून माघार घेतल्यानंतर सर्वच संघांनी नवीन खेळाडूंसोबत करार केले आहेत.

नक्की वाचा >> “बुक लॉन्चला आलेलं कोण करोना पॉझिटिव्ह आहे कसं कळणार?; त्यामुळेच शास्त्री, कोहलीला जबाबदार धरता येणार नाही”

“मी सर्वांच्याच संपर्कात आहे. मागील महिन्याभरापासून आमच्या चर्चा सुरु आहेत. संघामधील बदलांबद्दलही बऱ्याच चर्चा आम्ही केल्या आहेत. कोणी माघार घेतलीय कोणं नव्याने सहभागी झालंय याबद्दलही आम्ही बोललोय. आमच्या संघातील काही महत्वाच्या खेळाडूंच्या जागी आम्हाला नवीन खेळाडू घ्यावे लागले आहेत,” असंही विराट म्हणालाय. जुने आणि अनुभवी खेळाडू या पुढील स्पर्धेत नसले तरी नवीन खेळाडूंमधील कौशल्य हे सध्याच्या परिस्थितीनुसार अगदी उत्तम असल्याने त्यांच्यासोबत खेळण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं विराटने म्हटलं आहे.