31 October 2020

News Flash

पराभवानंतर विराटने टि्वट करुन दिला ‘हा’ संदेश

कर्णधार विराट कोहलीसाठी आयपीएलच्या ११ व्या मोसमाची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी विराटने एक उत्साह वाढवणारे टि्वट केले आहे.

कर्णधार विराट कोहलीसाठी आयपीएलच्या ११ व्या मोसमाची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी विराटने एक उत्साह वाढवणारे टि्वट केले आहे. काही वेळा काम धकाधकीचे, कठीण असते पण ज्यावेळी चांगले लोक तुमच्यासोबत असतात तेव्हा आनंद लुटला पाहिजे असे त्याने टि्वटमध्ये म्हटले आहे. या टि्वटसोबत विराटने एक फोटो पोस्ट केला असून त्यामध्ये तो स्वत:, फिरकी गोलंदाज यझुवेंद्र चहल आणि एबी डिव्हिलियर्स दिसत आहे.

हे तिघेही आरसीबीमधील त्याचे सहकारी आहेत. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने या सामन्यात १७६ धावा केल्या. कोलकताने हे आव्हान आरामात पार केले.

विराटने या सामन्यात ३१ धावा केल्या पण त्याच्या फलंदाजीत तो रुबाब दिसला नाही. ३३ चेंडूत ३१ धावांची खेळी करणाऱ्या विराटने एक चौकार आणि एक षटकार लगावला. पार्ट टाइम फिरकी युवा गोलंदाज नितीश राणाने एका अप्रतिम चेंडूवर त्याला क्लीन बोल्ड केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 7:05 pm

Web Title: virat kohli ipl rcb tweet
टॅग Ipl,Rcb,Virat Kohli
Next Stories
1 IPL 2018 : चेन्नई आणि कोलकाताच्या सामन्यावर सापांचे संकट
2 IPL 2018 – चेपॉकच्या मैदानाला २ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचं कडं, चेन्नईत आयपीएल सामन्यांना विरोध वाढला
3 IPL 2018 – दुखापतग्रस्त केदार जाधवऐवजी इंग्लंडच्या डेव्हि़ड विलीला चेन्नईच्या संघात जागा
Just Now!
X