रविवारपासून भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाशी 2 टी-20 आणि 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत विश्रांती घेतलेल्या विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून संघात पुनरागम केलं आहे. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही भारताची फिरकी गोलंदाजांची जोडगोळी सध्या चांगलीच फॉर्मात आहे. यापैकी युजवेंद्र चहलने कर्णधार विराट आणि उप-कर्णधार रोहित शर्माचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. विराटचा मैदानातील वावर हा एका योद्ध्याप्रमाणे असतो तर रोहित त्याच्या विरुद्ध एखाद्या साधूप्रमाणे मैदानात वावरतो, असं चहल म्हणाला.

आयपीएलमध्ये सध्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चहलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्सकडून केली होती. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चहल मैदानात उतरला होता. त्यामुळे आपल्याला दोन्ही कर्णधारांची शैली चांगलीच आत्मसात झाल्याचं चहलने स्पष्ट केली. “कोहली मैदानात असताना एका योद्ध्याप्रमाणे असतो. त्याच्यातली आक्रमकता दाखवण्याची एकही संधी तो सोडत नाही. पण रोहित शर्मा याच्याविरुद्ध आहे. रोहित मैदानात शांत आणि संयमी असतो. त्याचा मैदानातला वावर एखाद्या साधूप्रमाणे आहे.” चहलने रोहित आणि विराटची स्तुती केली.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराटसेनेचा नेट्समध्ये कसून सराव

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाने नेट्समध्ये कसुन सराव केला. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, उमेश यादव हे खेळाडू मैदानात घाम गाळताना दिसले.

अवश्य वाचा – Pulwama Terror Attack : जी देशभावना, तीच आमचीही – विराट कोहली