विराट कोहलीची आतापर्यंत सचिन तेंडुलकरशी होणारी तुलना तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. यंदाच्या वर्षात विराट कोहली, कसोटी-वन डे आणि टी-20 या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगल्याच फॉर्मात आहे. या खेळीदरम्यान विराटने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. मात्र पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीची तुलना, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली आहे.

अवश्य वाचा – विराट खेळत असताना प्रत्येक विक्रम धोक्यात – गावसकर

शोएब अख्तरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, विराट कोहली पुढची काही वर्ष असात तंदुरुस्त राहिला तर तो सर्व विक्रम मोडेल असं वक्तव्य केलं. साहजिकचं शोएबच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रीया आला, यामध्ये एकाने विराटची तुलना सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली. शोएब अख्तरने याला लगेचच समर्थन देत, विराटची तुलना ब्रॅडमन यांच्याशी केली.

विंडीजविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद 10 हजार धावांचा विक्रम मोडीत काढला होता. यानंतरही शोएब अख्तरने विराटची स्तुती केली होती. वन-डे मालिकेत 3-1 ने विजय मिळवल्यानंतर भारत व विंडीज यांच्यात रविवारपासून 3 टी-20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलेली असून, रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे.

अवश्य वाचा – विराट कोहली कसोटी क्रिकेट जिवंत ठेऊ शकतो – ग्रॅम स्मिथ