News Flash

इंग्लंड दौऱ्यावर निघण्याआधी कोहलीने आणलं लहानग्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू

इंग्लंड दौऱ्यात भारत ३ टी-२०, वन-डे व ५ कसोटी सामने खेळणार

इंग्लंड दौऱ्यावर निघण्याआधी कोहलीने आणलं लहानग्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू
विराट कोहली लहानग्या राधासोबत

भारतीय क्रिकेट संघ शनिवारी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्याकरता रवाना झाला आहे. ३ महिने चालणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ सुरुवातीला ३ टी-२०, ३ वन-डे आणि यानंतर ५ कसोटी सामने खेळणार आहेत. शनिवारी इंग्लंडला रवाना होत असताना, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला विमानतळावर त्याची एक लहानगी चाहती भेटली. राधा असं या मुलीचं नाव असून तिला विराटसोबत एक फोटो काढायचा होता. यावेळी विराट कोहलीनेही क्षणाचा विलंब न करता राधासोबत फोटो काढून तिची इच्छा पूर्ण केली. यावेळी राधाच्या चेहऱ्यावर आलेलं हसू सगळं काही सांगून जात होतं. बीसीसीआयने हा सुंदर प्रसंग आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

यावेळी विमानतळावर व विमानात बसल्यानंतर टीम इंडियाचे मस्ती करतानाचे फोटोही बीसीसीआयने सोशल मीडियावर टाकले आहेत.

आयपीएलचा हंगाम आटोपल्यानंतर विराट कोहली सरे क्रिकेट क्लबकडून काऊंटी क्रिकेट खेळणार होता. मात्र दुखापतीमुळे या स्पर्धेतून त्याला माघार घ्यावी लागली. यानंतर इंग्लंड दौऱ्याआधी घेण्यात आलेल्या यो-यो फिटनेस चाचणीत विराटची दुखापत बळावल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र बीसीसीआयने विराटच्या सहभागाला हिरवा कंदील देत प्रकरणावर पडदा टाकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2018 2:16 pm

Web Title: virat kohli leaves smile on childs face as team india depart for uk
Next Stories
1 दुबई मास्टर्स कबड्डी – भारताची केनियावर मात, रिशांक देवाडीगाची चमकदार कामगिरी
2 विरुष्काचं टेन्शन वाढलं; आली कायदेशीर नोटीस…
3 Hockey Champions Trophy – भारताचा विजयी चौकार, सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर ४-० ने मात
Just Now!
X