रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मोसमातील पहिल्या सामन्याआधी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आरसीबीच्या खेळाडूंनी स्वत: वर विश्वास ठेवला, तर ते पहिल्या सामन्यात मुंबईवर सरशी साधू शकतात, असे विराट म्हणाला. आयपीएलच्या चौदाव्या मोसमाला आजपासून प्रारंभ होत आहे. या मोसमाचा पहिला सामना गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू यांच्यात आज सायंकाळी 7:30 पासून रंगणार आहे.

मुंबई इंडियन्स हा एक चॅम्पियन संघ असल्याचे विराटने मान्य केले. मात्र, विरोधी संघाच्या कौशल्याकडे आरसीबीने जास्त लक्ष देऊ नये असेही तो म्हणाला. आरसीबीच्या यूट्यूब वाहिनीवर झालेल्या संभाषणादरम्यान विराट म्हणाला, “मला विश्वास आहे, की एक संघ म्हणून आम्हाला आपल्या कौशल्यावर आणि सामर्थ्यावर अवलंबून राहावे लागेल. मुंबई इंडियन्स निश्चितच चॅम्पियन संघ आहे. त्यांना ही स्पर्धा कशी जिंकता येईल, हे माहीत आहे. जर आम्ही त्यांच्या कौशल्याकडे लक्ष दिले, तर आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. आपण शेवटी क्रिकेटच खेळतो. येथे कोणताही संघ त्यांचा दिवस असेल तेव्हा जिंकू शकतो. जर तुम्हाला तुमच्यावर विश्वास असेल, तर तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता. त्यामुळे आम्हाला आमच्या संघावर विश्वास ठेवाव लागेल.”

आरसीबी आणि मुंबई इंडियन्स हे दोघेही आयपीएलच्या लोकप्रिय संघांपैकी एक आहेत. हेड-टू-हेड आकडेवारीत मुंबई इंडियन्सचा संघ अधिक बळकट आहे. मुंबई आणि बंगळुरू आतापर्यंत 29 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 19 सामने मुंबईने, तर 10 सामने बंगळुरूने जिंकले आहेत.

दोन्ही संघ 

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, पीयुष चावला, धवल कुलकर्णी , सौरभ तिवारी, आदित्य तरे, अ‍ॅडम मिलने, ख्रिस लिन, जयंत यादव, अनमोलप्रीतसिंग, क्विंटन डिकॉक, अनुकुल रॉय, मोहसिन खान, अर्जुन तेंडुलकर, मार्को जानसेन, युधवीर सिंग चरक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद अझरुद्दीन, डॅनियल ख्रिश्चन, वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमीसन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, यजुर्वेंद्र चहल, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, अ‍ॅडम झम्पा, सचिन बेबी, श्रीकर भारत, पवन देशपांडे, रजत पाटीदार, फिन एलन, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद,