News Flash

वेस्टइंडिज दौऱ्यानंतर विराट अनुष्कासोबत न्यूयॉर्कमध्ये!

अनुष्का शर्मा आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी न्यूयॉकमध्ये गेली आहे.

Virat Kohli and Anushka Sharma in New York :येत्या २६ जुलैपासून भारत श्रीलंकेच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे सध्या विराटकडे बराच वेळ आहे. ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विराट अमेरिकेत गेला आहे. तर अनुष्का शर्मा देखील IIFA 2017 साठी न्यूयॉर्कमध्ये गेली आहे.

वेस्ट इंडिजचा दौरा आटोपून भारतीय संघातील खेळाडू भारतात परतले आहेत. येत्या १० दिवसांमध्येच टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची सुरूवात होत आहे. त्यामुळे सध्या संघातील सर्व खेळाडू विश्रांतीवर भर देत आहे. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली याने हा वेळ आपली प्रेयसी अनुष्का शर्मा हिच्यासमवेत एन्जॉय करण्यासाठी सत्कारणी लावला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. याठिकाणी कोहली आणि अनुष्का एकत्र फिरत असल्याची काही छायाचित्रे प्रसारमाध्यमांच्या हाती लागली आहेत. अनुष्का आणि विराटने आपापल्या इन्स्टाग्राम व ट्विटर अकाऊंटवरून नुकतीच न्यूयॉर्क शहरातील काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर दोघेही निवांतपणे भटकत असल्याचे यापैकी एका छायाचित्रात दिसत आहे.

येत्या २६ जुलैपासून भारत श्रीलंकेच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे सध्या विराटकडे बराच वेळ आहे. ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विराट अमेरिकेत गेला आहे. तर अनुष्का शर्मा देखील IIFA 2017 साठी न्यूयॉर्कमध्ये गेली आहे. २६ जुलैपासून भारताच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार असून या दौऱ्यात भारत श्रीलंकेसोबत ३ कसोटी, ५ वन-डे आणि एक टी-२० सामना खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांसाठी २ सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. २१ आणि २२ जुलैला हे सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. या दौऱ्यासाठी दोन्ही संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये. मायदेशात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाची ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 11:28 pm

Web Title: virat kohli makes best use of free time caught holidaying with anushka sharma in new york
Next Stories
1 मिताली राज आणि पुनम राऊतची खेळी व्यर्थ; ऑस्ट्रेलियाचा भारतावर ८ गडी राखून विजय
2 कॅनडा ओपनमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू चमकले
3 हॉकीलीग सेमीफायनल स्पर्धेत भारतीय महिला उपांत्यपूर्व फेरीत, चिलीवर १-० ने मात
Just Now!
X