आपल्या ट्विटर अकाऊंटवरून थेट लग्नाचा प्रस्ताव मांडणाऱया इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाच्या अष्टपैलू खेळाडू डॅनियल वेटची विराट कोहलीने भेट घेतली.
सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱयावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडमधील नेडबर्शियार संघासोबत भारताचा सराव सामना झाला या दरम्यान विराटने डॅनियल वेटची भेट घेऊन तिच्यासोबत ‘सेल्फी’ काढला.
विराट अजून लहान आहे- डॅनियलच्या ‘त्या’ ट्विटवर कोहलीच्या आईची प्रतिक्रिया

अनुष्काचे विराट प्रेम
डॅनियल वेटचा भाऊ मॅक्स वेटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर विराट-डॅनियल भेटीचा हा सेल्फी शेअर केला आहे. या छायाचित्रा खाली मॅक्सने ‘ही जोडी चांगली जमेल’ असेही विनोदातून म्हटले आहे.
आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यातील विराटच्या जिगरबाज खेळीनंतर डॅनियल वेट हिने ट्विटरवरून विराटसमोर लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याआधी विराट आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण आले होते. इतकेच काय, विराटच्या ओढीने अनुष्का न्यूझीलंडलाही गेली होती.
विराट कोहली बोहल्यावर चढणार?