News Flash

फेडररच्या भेटीने कोहली भारावला

रॉजन फेडरर, आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व.. क्रीडा जगतासाठी आदर्शवत.. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही लाडका..

| January 13, 2015 12:09 pm

रॉजन फेडरर, आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व.. क्रीडा जगतासाठी आदर्शवत.. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही लाडका.. या दोन महान क्रीडापटूंची भेट विम्बल्डनमध्ये होतेच, पण ब्रिस्बेन खुल्या टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने फेडररला भेटण्याचा योग आला तो भारताचा नवनिर्वाचित कसोटी कर्णधार विराट कोहलीला. कोहलीच्या खात्यामध्ये भरपूर धावा असल्या तरी महानता म्हणजे काय, हे कोहलीला फेडररला भेटल्यावर पुन्हा एकदा समजले. ‘‘हा दिवस आयुष्यात मी कधीही विसरू शकत नाही. कोर्टवरील आणि कोर्टबाहेरही फेडरर तेवढाच महान मला वाटला, खराखुरा महान,’’ असे कोहलीने ट्विटरवर म्हटले आहे. ब्रिस्बेन खुली टेनिस स्पर्धा जिंकत फेडररने एक हजारावे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर कोहलीबरोबरच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथनेही त्याची भेट घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 12:09 pm

Web Title: virat kohli meets roger federer
Next Stories
1 रिओ ऑलिम्पिक नंतर निवृत्तीचे मेरी कोमचे संकेत
2 कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचे भविष्य उज्ज्वल!
3 भारतरत्न पुरस्कार सर्वप्रथम ध्यानचंद यांना मिळायला हवा होता!
Just Now!
X