25 February 2021

News Flash

ट्विटरवर सचिन, धोनीपेक्षाही कोहली सरस!

कोहलीच्या ट्विटर अकाऊंट चाहत्यांची संख्या ८ लाखांच्या घरात पोहोचली

दिग्गजांचे विक्रम मोडीस काढू शकेल असा आश्वासक चेहरा म्हणून पाहिले जात असलेल्या भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने समाजमाध्यमांतील लोकप्रियतेत दिग्गजांना मागे टाकण्यास सुरूवात केली आहे. कोहलीने ट्विटरवरील लोकप्रियतेत माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर आणि भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. कोहलीच्या ट्विटर अकाऊंट चाहत्यांची संख्या ८ लाखांच्या घरात पोहोचली असून सचिन तेंडुलकरच्या ट्विटर अकाऊंटचे सध्या ७ लाख ७३ हजार चाहते आहेत. तर, धोनीने अद्याप पाच लाखांचाही आकडा गाठलेला नाही.
विराट कोहलीच्या नेत्तृत्वाखालील भारतीय संघाने मागील आठवड्यात श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकून गेल्या २२ वर्षांपासूनचा भारतीय संघाचा श्रीलंकेतील कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणला. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्त्वाचे संपूर्ण देशभरातून कौतुक झाले. तसेच ट्वेन्टी-२०च्या जागतिक फलंदाजी क्रमवारीत कोहली सध्या अव्वल स्थानी आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 6:44 pm

Web Title: virat kohli now has 8 million followers overtakes sachin tendulkar and ms dhoni on twitter
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 धडाकेबाज! फेडरर व मरे यांचा शानदार विजय
2 हॅमिल्टन चालिसा!
3 सानिया, बोपण्णा उपउपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X