News Flash

तुसी ग्रेट हो…! असा पराक्रम करणारा विराट एकमेव कर्णधार

भारतीय संघाचा सलग दहावा विजय

भारतीय संघानं दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ गड्यांनी पराभव करत तीन सामन्याची मालिका २-० च्या फरकानं खिशात घातली आहे. या विजायासह भारतीय संघाचा हा लागोपाठ दहावा विजय होता. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं ही अतुलनीय कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विराट कोहलीनं आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० सामन्याची मालिका जिंकली आहे. आतापर्यंत हा कारनामा कोणत्याही कर्णधाराला करता आलेला नाही. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. विदेशात सर्वाधिक टी-२० जिंकण्याचा पराक्रमही विराटसेनेनं करुण दाखवला आहे.

२०१७-१८ भारतीय संघ दक्षिण आफ्रिकाच्या दौऱ्यावर गेला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघानं टी-२० मालिका २-१ जिंकली होती. या मालिकेत पहिले दोन सामने जिंकल्यानंतर नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं होतं. २०१८ मध्ये विराटच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं टी-२० मालिकेवर २-१ नं नाव कोरलं होतं. २०१९-२० मध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघानं ५-० च्या फरकानं न्यूझीलंडचा पराभव केला होता.

२०२० मध्ये भारतीय संघानं पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत तीन सामन्याची टी-२० मालिका २-० नं खिशात घातली आहे. उर्वरित सामना जिंकून भारतीय संघ ३-० च्या फरकानं ही मालिका जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरले. पहिला सामना भारतानं ११ धावांनी तर दुसरा सामना भारतानं सहा गड्यांनी जिंकला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 5:57 pm

Web Title: virat kohli only indian captain to win t20i series in all sena countries nck 90
Next Stories
1 दस का दम…! भारतानं मोडला पाकिस्तानचा विक्रम
2 डावखुऱ्या फलंदाजांमध्ये ‘गब्बर’ ठरला उजवा, महत्वाच्या यादीत अव्वल स्थानी झेप
3 शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घ्या नाहीतर खेलरत्न पुरस्कार परत करेन – विजेंदर सिंह
Just Now!
X