भारतीय कर्णधार विराट कोहलीचं फलंदाजीतील सातत्य आणि धावांची भूख पाहून त्याला ‘रन’मशीन म्हटले जातेय. कमी कालावधीत विराट कोहलीनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सचिन तेंडुलकर आणि पॉन्टिंगचे अनेक विक्रम विराटने मोडीत काढले आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकांच्या बाबातीत विराट दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नावावर ४३ शतकांची नोंद आहे तर सचिन तेंडुलकरच्या नावावर ४९ शतकं आहेत. विराट कोहलीची फलंदाजी पाहता पुढील काही दिवसांमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत निघेल असं दिसतंय. एकदिवसीय सामन्यात सरासरी ५० पेक्षा आधिक धावा काढण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. एकदिवसीय सामन्यात ५० पेक्षा आधिक धावा काढण्याची विराट कोहलीची सरासरी ४२ टक्के आहे.

विराट कोहलीनं २३६ डावांपैकी ४२ टक्के डावांमध्ये ५० पेक्षा आधिक धावा काढल्या आहेत. २३६ डावांत विराट कोहलीच्या नावावर ४३ शतकं आणि ५७ अर्धशतकं आहेत. २३६ डावांत १०० वेळा विराट कोहलीनं ५० पेक्षा आधिक धावा काढल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात सरासरी ५० पेक्षा आधिक धावा काढण्याची सचिन तेंडुलकरची कामगिरी पाहूयात. सचिन तेंडुलकरनं ४५२ डावांत फलंदाजी करताना ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकं ठोकली आहेत. ४५२ डावांत सचिने १४५ वेळा ५० पेक्षा आधिक धावा काढल्या आहेत. म्हणजेच एकदिवसीय सामन्यात ५० पेक्षा आधिक धावा काढण्याची सचिनची सरासरी ३३ टक्के आहे.

पॉन्टिंगची कामगिरी पाहूयात – 

रिकी पॉन्टिंगने ३६५ डावांत ३० शतकं आणि ८२ अर्धशतकं झळकावली आहेत. पॉन्टिंगनं ३६५ डावांत ११२ वेळा ५० पेक्षा आधिक धावा केल्या आहेत. म्हणजेच एकदिवसीय सामन्यात ५० पेक्षा आधिक धावा काढण्याची पॉन्टिंगची सरासरी ३० टक्के आहे.

एबी डिव्हिलियर्सची कामगिरी पाहूयात –

मिस्टर ३६० उर्फ एबी डिव्हिलियर्सने २१८ एकदिवसीय सामन्यात २५ शतकं आणि ५३ अर्धशतकं झळकावली आहेत. एबीनं एकदिवसीय सामन्यात ७८ वेळा ५० पेक्षा आधिक धावा काढल्या आहेत. म्हणजेच एबीची सरासरी ५० धावा काढण्याची टक्केवारी ३५ आहे.

रोहित शर्माची सरासरी ३३ टक्के –

एकदिवसीय सामन्यात ५० धावा काढण्याची रोहितची सरासरी ३३ टक्के आहे. रोहितने एकदिवसीय सामन्यातील २१७ डावांत २९ शतकं आणि ४३ अर्धशतकं झळकावली आहे. म्हणजेच रोहितनं ७२ वेळा ५० पेक्षा आधिक धावा काढल्या आहेत. रोहितची ५० धावा काढण्याची सरासरी ३३ टक्के आहे.

सरासरी ५० धावा काढण्याची गांगुलीची टक्केवारी पाहूयात –

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं ३०० डावांत फलंदाजी करताना २२ शतकं आणि ७२ अर्धशतकं झळकावली आहेत. गांगुलीनं एकदिवसीय सामन्यात ९४ वेळा ५० पेक्षा आधिक धावा काढल्या आहेत. म्हणजेच एकदिवसीय सामन्यात गांगुलीची ५० पेक्षा आधिक धावा काढण्याची सरासरी ३१ टक्के आहे.