भारताचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याचसोबत त्याच्या फिटनेससाठीही अनेकांचा तो आदर्श आहे. गेल्या काही वर्षात विराटने भारतीय संघाचा कर्णधार म्हणूनही आपले स्थान पक्के केले आहे. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर असो, तो कायमच उत्साही असतो. त्याच्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टीबाबत चाहत्यांना उत्सुकता असते. आपल्या चाहत्यांसाठी विराटने आज एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून विराट १० वर्षांपूर्वी कसा दिसायचा ते त्याने दाखवले आहे.

IND vs SL : टी २० मालिकेत ‘या’ ३ खेळाडूंच्या कामगिरीवर असेल लक्ष

गेले काही दिवस अनेक संस्था आणि क्रिकेट जाणकार दशकातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीचा संघ जाहीर करत आहेत. त्यापैकी जवळपास प्रत्येकाच्या संघात विराट कोहलीला स्थान मिळाले आहे. काही संघांमध्ये तर विराटला कर्णधार म्हणूनही निवडण्यात आले आहे. पण हाच विराट १० वर्षांपूर्वी कसा दिसायचा? याची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल. त्यामुळे विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्वत:चा दशकाच्या सुरूवातीचा आणि शतक संपतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

Video : ४५ मिनिटांनंतर स्मिथने पहिली धाव घेतली अन् स्टेडियममध्ये काय झालं पाहा…

पहा विराटचे ट्विट आणि फोटो –

—–

महत्त्वाची बातमी – ‘कॅप्टन कूल’ धोनी पुन्हा कर्णधारपदी; बुमराह संघाबाहेर

विराटची २०१० ते २०१९ या दशकातील कामगिरी –

भारताचा कर्णधार विराट कोहली या दशकात एकूण २२७ सामने खेळला आहे. त्यात त्याने तब्बल ११ हजार १२५ धावा ठोकल्या आहेत. त्याने तुफान फलंदाजीच्या बळावर सर्वाधिक १०३८ चौकार लगावत ४२ शतके आणि ५२ अर्धशतके केली आहेत. या दशकात विराटने ३५ वेळा सामनावीराचा पुरस्कार आणि ७ वेळा मालिकावीराचा पुरस्कार पटकावला आहे. याशिवाय संपूर्ण दशकात त्याने एकूण ११७ झेल टिपत मैदानातही चपळ असल्याचे सिद्ध केले आहे.