भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा हे दोघं जर मैदानात सीमारेषेवर फिल्डिंग करत असतील, तर फलंदाज तिसऱ्या ठिकाणी फटका मारून धाव घेण्याचा विचार करतो. मैदानातील या दोघांच्या फिल्डिंगची ख्याती सर्वत्र पसरलेली आहे. या दोघांपैक्षा चपळ फिल्डर भारतीय संघाच सध्यातरी सापडणं विरळाच… पण या दोघांपैकी सर्वोत्तम म्हणून एकाचीच निवड करायची असेल तर…? नुकतीच एका भारतीय क्रीडा वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट टाकली. या पोस्ट मध्ये विराट आणि जाडेजा या दोघांची फिल्डिंग करून चेंडू फेकतानाची पोज होती. त्यांचा एकत्रित फोटो पोस्ट करून असा प्रश्न विचारण्यात आला, “जर तुमच्याकडे चेंडू मारून स्टंप उडवण्याची एकमेव संधी असेल, तर तुम्ही कोणाला निवडाल… जाडेजा की विराट?”

CSK च्या संघाकडून खेळशील का? एबी डीव्हिलियर्स म्हणतो…

त्या प्रश्नावर अनेक चाहत्यांनी विविध उत्तरे दिली. काही चाहत्यांनी तर तिसऱ्याच कोणत्यातरी खेळाडूचेदेखील नाव सुचवले. हीच पोस्ट त्या वाहिनीने इन्स्टाग्रामवरदेखील टाकली होती. त्यावर अखेर विराटने या प्रश्नावर उत्तर देत वादच मिटवून टाकला. “मी प्रत्येकवेळी अशा परिस्थितीत ‘जड्डू’ला (जाडेजा) निवडेन. वाद संपला!”,असा रिप्लाय देत विराटने तो प्रश्नच निकालात काढला.

रोहित म्हणतो, “करोनाच्या तडाख्यात सकारात्मक गोष्ट म्हणजे…”

जाडेजाला कोपरखळी मारणारा जॉन्टी ऱ्होड्स झाला होता ट्रोल

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एक क्रिकेट मालिका रंगली होती. त्या क्रिकेट मालिकेत रवींद्र जाडेजाने फिल्डींग तर अप्रतिम केलीच, पण त्याचसोबत फलंदाजीतही आपली कमाल दाखवून दिली. त्यानंतर जॉन्टी ऱ्होड्सने ट्विट केले होते की जेव्हा फिल्डर चांगली फलंदाजी करतो, तेव्हा चांगलं वाटतं. त्याच्या या ट्विटवर एका चाहत्याने त्याला लगेच रिप्लाय दिला की जाडेजा केवळ फिल्डरच नाही, तर तो एक उत्तम गोलंदाज आणि फलंदाजदेखील आहे. ICC च्या क्रमवारीत त्याने अनेकदा अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल असलं काही बोलू नको. तू स्वत: क्रमवारीत कोणत्या प्रकारात एकेरी आकडेवारीत आला होतास ते सांग, असा सवाल त्या चाहत्याने ऱ्होड्सला विचारला होता.