ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाला मोठी सुट्टी मिळाली आहे. यादरम्यान भारतीय संघातली प्रत्येक खेळाडू आपला मोकळा वेळ आपापल्या पद्धतीने व्यतित करताना दिसत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही, पत्नी अनुष्का शर्माची भूमिका असलेला ‘झिरो’ हा सिनेमा पाहिला. याचसोबत विराटने आपल्या लूकमध्ये बदल केला असून, बदललेल्या हेअरस्टाईलचा फोटो त्याने आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केला आहे.
— Virat Kohli (@imVkohli) December 22, 2018
चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे ‘बॉक्सिंग डे’ कसोटीचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू विश्रांती घेत आहेत. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू रविवारपासून सरावाला सुरुवात करणात आहेत. भारतीय संघ मेलबर्न येथे दाखल झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 23, 2018 3:56 pm