News Flash

प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळण्यास विराट तयार -गांगुली

‘प्रकाशझोतामधील कसोटी सामने खेळण्यास कोहली तयार नाही, अशा प्रकारची चर्चा होत होती.

| October 26, 2019 07:59 am

कोलकाता : प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली तयार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले.

‘बीसीसीआय’च्या मुख्यालयात कोहलीशी झालेल्या बैठकीबाबत गांगुली म्हणाला, ‘‘प्रकाशझोतामधील कसोटी सामने खेळण्यास कोहली तयार नाही, अशा प्रकारची चर्चा होत होती. परंतु यात तथ्य नाही. कसोटी क्रिकेटला पुढे जाण्यासाठी ते आवश्यक आहे. याबाबत आमचे एकमत झाले आहे.’’

ईडन गार्डन्स स्टेडियमवर बंगाल क्रिकेट संघटनेकडून झालेल्या विशेष सत्कारानंतर गांगुली म्हणाला, ‘‘मी दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटी सामन्याचा समर्थक आहे. हे प्रत्यक्षात केव्हा होईल, हे मला माहीत नाही. परंतु मी पदावर असेपर्यंत त्याचा पाठपुरावा करीन.’’

गांगुलीचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील वर्षी वर्षी जुलै महिन्यात संपणार आहे. परंतु  भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर पुढील कसोटी सामने थेट डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 1:51 am

Web Title: virat kohli ready to play day night test matches says sourav ganguly zws 70
Next Stories
1 जायबंदी विल्यम्सन इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकणार
2 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : क्रूसच्या निर्णायक गोलमुळे माद्रिदचा पहिला विजय
3 जागतिक स्क्वॉश स्पर्धा : जोश्नाची विजयी सलामी
Just Now!
X