News Flash

‘‘वामिका नावाचा अर्थ काय आणि ती कशी आहे? आम्ही तिची झलक पाहू शकतो का?”

चाहत्याच्या प्रश्नांना विराट कोहलीनं दिली उत्तरं

कुटुंबासह विराट कोहली

यावर्षी २१ जानेवारीला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही एका गोंडस मुलीचे पालक झाले. आपल्या मुलीच्या जन्माच्या आधी विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता, तेथे त्याने पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेतला. पितृत्वाच्या रजेसाठी विराट मायदेशी आला आणि त्याने मुलगी आणि अनुष्कासोबत वेळ घालवला. मुलीच्या जन्मानंतर काही दिवसानंतर अभिनेत्री अनुष्काने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीच्या नावाची म्हणजेच वामिकाच्या नावाची घोषणा केली.

वामिकाने आपल्या जन्मापासूनच सोशल मीडियावर वर्चस्व राखले. वामिकाच्या नावाने सोशल मीडियावर अनेक फॅन पेजही तयार झाले. मात्र, विरुष्काने वामिकाच्या चेहऱ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. यामागे विराटने आपल्या मुलीच्या नावाचा अर्थ सांगत तिला सोशल मीडियावर कधी आणणार याबाबत सांगितले आहे.

हेही वाचा – अवघ्या ‘दोन’ शब्दात विराटने सांगितले धोनीसोबतचे नाते!

वामिका हे दुर्गा माचे दुसरे नाव असल्याचे उत्तर विराटने दिले. त्याने वामिकाला सोशल मीडियाची कधी ओळख करून देणार याबाबतही सांगितले. तो म्हणाला, ”स्वत: साठी योग्य निवड करण्याइतपत समज येईपर्यंत आम्ही तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.”

Virat kohli Refuses To Share vamika Pictures On Social Media

हेही वाचा – राजस्थान रॉयल्सनं IPLचं केलं ‘भन्नाट’ पद्धतीनं स्वागत, VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू

या वर्षाच्या सुरुवातीला कोहली आणि अनुष्काने एक संदेश देताना आपल्या मुलीच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले. सध्या विराट पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 1:00 pm

Web Title: virat kohli refuses to share vamika pictures on social media adn 96
Next Stories
1 टोकियो ऑलिम्पिकमधील कुस्ती सामन्यांत रेफरी म्हणून काम करणार अशोक कुमार!
2 इरफान पठाणसोबतच्या ‘त्या’ फोटोबद्दल बायकोनं सोडलं मौन, म्हणाली…
3 अवघ्या ‘दोन’ शब्दात विराटने सांगितले धोनीसोबतचे नाते!
Just Now!
X