21 September 2020

News Flash

विराटला पाहून मला इम्रान खानची आठवण येते-शास्त्री

कर्णधार म्हणून विराट कोहली स्वतःला आणखी विकसित करेल यात शंका नाही असंही शास्त्री यांनी म्हटलं आहे

संग्रहित छायाचित्र

विराट कोहलीचा खेळ पाहून मला इम्रान खान आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांची आठवण येते असं टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. क्रिकेटच्या दोन महान खेळाडूंशी विराट कोहलीची तुलना केली आहे. मी जेव्हा व्हिव्हियन रिचर्ड्स आणि इम्रान खान या दोन खेळाडूंबाबत विचार करतो तेव्हा त्या दोघांच्या जवळ जाईल असा एकमेव खेळाडू मला दिसतो आणि तो विराट कोहली आहे असं रवी शास्त्रींनी म्हटलं आहे.

विराटचा ज्याप्रकारे खेळ करतो, त्याचा दबदबा निर्माण करू पाहतो त्या सगळ्या पद्धतीही या दोन खेळाडूंशी मिळत्याजुळत्या आहेत. एवढंच नाही तर ट्रेनिंग, त्याग आणि खेळासाठी झोकून देण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी व्हिव्हियन रिचर्ड्स आणि इम्रान खान यांच्यात जशा होत्या तशाच त्या विराट कोहलीमध्येही दिसतात असेही शास्त्री यांनी म्हटले आहे. टीम इंडियाचं भाग्य आहे कारण त्यांना विराटसारखा कर्णधार लाभला आहे.

अनेकदा विराट कोहलीला पाहून मला इम्रान खानची आठवण येते. ज्याप्रकारे तो खेळाडूंपुढे उदाहरणं देतो किंवा ज्याप्रकारे अनेक खास गोष्टींमध्ये पुढे येऊन नेतृत्त्व करतो तशीच काहीशी वृत्ती इम्रानची होती. कर्णधार म्हणून विराट स्वतःला आणखी विकसित करेल यात मला काहीही शंका नाही असेही रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. क्रिकबझ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी हे वक्तव्य केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 7:13 pm

Web Title: virat kohli reminds me vivian richards and imran khan says ravi shastri
Next Stories
1 आता Netflix वर दिसणार ‘क्रिकेट गेम्स’
2 Video : एकच फाईट वातावरण टाईट!; कुस्तीच्या रिंगणात हरभजनचा जलवा
3 मराठमोळ्या स्मृती मंधानाला Forbesच्या यादीत स्थान
Just Now!
X