07 December 2019

News Flash

कोहलीला विश्रांती?

कोहलीच्या सांगण्यावरूनच पुढील निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

बांगलादेशविरुद्ध ३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कोहली सातत्याने क्रिकेट खेळत आहे. यादरम्यान झालेल्या भारताच्या ५६ पैकी ४८ सामन्यांमध्ये कोहली खेळला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत केली जाणार आहे. ‘‘कोहलीवरील अतिरिक्त ताण लक्षात घेता, त्याला बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विश्रांती दिली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर निवड समिती याविषयी कोहलीशी चर्चा करणार आहे. कोहलीच्या सांगण्यावरूनच पुढील निर्णय घेतला जाईल,’’ असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

First Published on October 20, 2019 1:22 am

Web Title: virat kohli rested for the twenty20 series abn 97
Just Now!
X