04 December 2020

News Flash

कसोटी क्रमवारीत विराटने राखलं अव्वल स्थान

आयसीसीने जाहीर केली क्रमवारी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेदरम्यान धोनी आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. या मालिकेत भारतीय संघाने, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आपला पहिला कसोटी विजय संपादन केला होता. दरम्यान विराटच्या पाठोपाठ केन विल्यमसनने दुसरं आणि चेतेश्वर पुजाराने तिसरं स्थान कायम राखलं आहे. पहिल्या सर्वोत्तम १० फलंदाजांमध्ये विराट आणि पुजारा या दोन फलंदाजांनाच आपलं स्थान कायम राखता आलेलं आहे.

अशी आहे आयसीसीची कसोटी क्रमवारी –

१) विराट कोहली – भारत (९२२ गुण)

२) केन विल्यमसन – न्यूझीलंड (९१३ गुण)

३) चेतेश्वर पुजारा – भारत (८८१ गुण)

४) स्टिव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलिया (८५७ गुण)

५) हेन्री निकोलस – न्यूझीलंड (७७८ गुण)

६) जो रुट – इंग्लंड (७६३ गुण)

७) डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया (७५६ गुण)

८) एडन मार्क्रम – दक्षिण आफ्रिका (७१९ गुण)

९) क्विंटन डी-कॉक – दक्षिण आफ्रिका (७१८ गुण)

१०) फाफ डु प्लेसिस – दक्षिण आफ्रिका (७०२ गुण)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 5:59 pm

Web Title: virat kohli retains no 1 spot in icc test rankings psd 91
टॅग Icc,Virat Kohli
Next Stories
1 बेन स्टोक्सने नाकारला New Zealander of the Year चा पुरस्कार
2 Video : “लष्करी गणवेश तुला शोभून दिसतो”; आनंद महिंद्रानी केला धोनीचा व्हिडीओ पोस्ट
3 कसोटी क्रिकेटमध्ये नवीन पर्व, Ashes मालिकेपासून होणार ‘हा’ बदल
Just Now!
X