17 January 2021

News Flash

धोनी, रोहितनंतर विराटला कन्यारत्न; अमिताभ बच्चन यांनी केलं हटके ट्विट

तुम्ही पाहिलंत का त्यांचं खास ट्विट

क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. अनुष्काने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला. विराटने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. ‘कळवण्यास खूप आनंद होत आहे की आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली’, अशा आशयाचा संदेश त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. चाहत्यांचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी त्याने आभार मानले. त्यांना कन्यारत्न झाल्यावर विराट-अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर त्यांनी एक हटके पोस्ट केली.

अमिताभ यांनी एक फोटो पोस्ट केला. या फोटोत भारतीय संघातील विविध क्रिकेटपटूंची नावं होती. विशेष म्हणजे या यादीत अशाच क्रिकेटपटूंची नावं होती ज्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. ही यादी धोनी, रैना यांच्यापासून सुरू झाली. यात रोहित, शमी, अश्विन, अजिंक्य रहाणे या साऱ्यांचीही नावं आहेत. या यादीतच्या शेवटी विराटचं नाव जोडण्यात आलं आहे. आणि, भारताचा भविष्यातील महिला क्रिकेट संघ तयार होत असल्याचं लिहिलं आहे. इतकंच नव्हे, तर अमिताभ यांनी फोटोसोबत कॅप्शन जोडलं असून त्यात धोनीची मुलगी या संघाची कर्णधार असेल का? असा मजेशीर सवाल केला आहे.

दरम्यान, अमिताभ महिला संघाच्या भविष्याबाबत बोलत असले तरी सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंची परिस्थिती बिकट आहे. भारताने मालिकेच्या सुरूवातीला दोन-तीन खेळाडूंना दुखापतीमुळे संघाबाहेर केल असताना आता चौथ्या कसोटीआधी सहा ते सात खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या कसोटीत भारतीय संघ कोणत्या खेळाडूंसोबत मैदानात उतरतो हे पाहणे औत्स्युक्याचं असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 9:53 am

Web Title: virat kohli rohit sharma ms dhoni daughters women cricket team bollywood star amitabh bachchan comedy tweet vjb 91
Next Stories
1 अश्विनच्या तंदुरुस्तीबाबतही संभ्रम!
2 पोग्बाच्या निर्णायक गोलमुळे मँचेस्टर युनायटेड अग्रस्थानी
3 ऑस्ट्रेलियन खुली टेनिस पात्रता फेरी : अंकिताला पुन्हा हुलकावणी
Just Now!
X