30 September 2020

News Flash

विराट कोहलीचा पराक्रम, धोनी-गांगुलीला टाकले मागे

जगात तिसऱ्या स्थानावर

दक्षिण आफ्रिकेचा सहा गड्यांनी पराभव करत भारतीय संघानं विश्वचषकाची सुरूवात दणक्यात केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा हा ५० वा विजय ठरला आहे. एकदिवसीय सामन्यात ५० विजय मिळवणारा विराट कोहली चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे.

भारतीय संघाला सर्वाधिक वेगवान ५० विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर पोहचला आहे. विराट कोहलीनं एम. एस. धोनी आणि सौरव गांगुलीसारख्या दिग्गज माजी कर्णधारांना मागे टाकले आहे. ५० विजयासाठी धोनी ११०, मोहम्मद अजहरुद्दीन ९० आणि सौरव गांगुलीला ७६ सामने वाट पहावी लागली होती. विराट कोहलीनं ६९ व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कमी सामन्यात संघाला ५० विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. विंडिजचे माजी कर्णधार व्हिव्हियन रिचर्डस यांचा विक्रम कोहलीनं मोडला. व्हिव्हियन रिचर्डस यांनी ७० सामन्यात संघाला ५० विजय मिळवून दिले होते. विंडीजचे क्लाइव लॉयड आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग सर्वाधिक विजय मिळवण्यात संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहे. त्यांनी ६३ सामन्यात संघाला ५० विजय मिळवून दिले आहेत. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचे हॅन्सी क्रोनिए आहेत.

दरम्यान, रोहित शर्माची आक्रमक शतकी खेळी आणि गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला. आफ्रिकेवर ६ गडी राखून मात करत भारताने विश्वचषक स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 4:12 pm

Web Title: virat kohli s fastest 50 odi match win as captain nck 90
Next Stories
1 World Cup 2019 : अटीतटीच्या लढतीत कांगारूंची विंडीजवर सरशी
2 World Cup 2019 : “पाक विजयावर खुश होणाऱ्या सानियाला कोणीतरी ‘हे’ही सांगा”
3 डिव्हीलियर्स म्हणाला, निवृत्ती मागे घेतो विश्वचषक खेळू द्या ! आफ्रिकन बोर्ड म्हणालं शक्य नाही
Just Now!
X