News Flash

फलंदाजांच्या अपयशामुळे मालिका गमावली: कोहली

गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली

कर्णधार विराट कोहली

आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील फलंदाजांच्या कामगिरीवर सर्वच स्तरांवरून टिका होत असताना कर्णधार विराट कोहलीनेही दुसऱ्या कसोटीच्या पराभवाचे खापर फलंदाजांवरच फोडले आहे. फलंदाज अपयशी झाल्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावली, असे भारताचा विराट कोहलीने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

‘चांगल्या भागीदाऱ्या करण्यात आमचे फलंदाज अपयशी ठरले. गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. परंतु फलंदाज अपेक्षांची पूर्तता करू शकले नाही. आम्ही कसोटी वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले, पण ते अपुरे ठरले. क्षेत्ररक्षणातही सरस असलेला आफ्रिकेचा संघ यामुळेच दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकला,’ असे कोहलीने सांगितले. ‘‘खेळपट्टीबाबत आमचा अपेक्षाभंग झाला. नाणेफेकीचा कौल घेण्याआधी खेळपट्टीचे जे स्वरूप दिसत होते, तसे प्रत्यक्ष सामन्यात नव्हते. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात हाराकिरी पत्करल्यानंतर आम्ही सामन्यावर नियंत्रण मिळवायला हवे होते,’’ असे कोहलीने सांगितले.

भारतीय संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी केलेल्या संघ निवडीवर चांगलीच टिका झाली होती. वृद्धीमान शहाऐवजी पार्थिव पटेलला संधी देणे, भुवनेश्वर कुमारला बाहेर बसवण्याच्या निर्णयांवर माजी खेळाडूंपासून ते चाहत्यांनीही टिका केली होती. अजिंक्य रहाणेला सलग दुसऱ्या कसोटीमध्येही संघाबाहेर ठेवण्यामागील कारण अद्यापही अस्पष्ट असून याबद्दलही बरीच चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 11:22 am

Web Title: virat kohli says batting failure led to series loss
Next Stories
1 तुम्ही संघ निवडा आम्ही तो खेळवू; कोहली पत्रकारांवर संतापला
2 रोनाल्डिनोची निवृत्तीची घोषणा
3 त्सोंगाचा निसटता विजय!
Just Now!
X