विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात टी-२० मालिका जिंकण्याचा कारणामा केला आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं ११ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ६ गड्यांनी पराभव केला. ऑस्ट्रेलिया संघानं दिलेल्या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारतानं यशस्वी केला. भारताकडे राहुल-शिखरनं दमदार सलामी दिली. त्यानंतर विराट कोहलीनेही सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावसंख्येवर भर दिला. त्यानंतर मोठे फटके मारले. अखेरच्या चार षटकात हार्दिक-अय्यरच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर ५४ धावा चोपत भारतीय संघानं विजय खेचून आणला.
या सामन्यात विराट कोहलीनं लगावलेल्या षटकाराचं सर्वांनी लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्ही विराट कोहलीला असा षटकार लगावताना याआधी कधीही पाहिलं नसेल . पण दुसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहलीनं आपलं नवीन रुप दाखवलं आहे. विराट कोहलीनं १५ षटकांतील चौथ्या चेंडूवर डाव्या यष्टीच्या बाहेर जात गुडघ्यावर बसून लेग साइडच्या दिशेन उतुंग षटकार लगावला. मिस्टर-३६0 सारखा. हो… विराट कोहलीचा तो षटकार पाहल्यानंतर तुम्हाला नक्कीच एबीच्या षटकाराची आठवण येईल. सोशल मीडियावर अनेकांनी विराटचा षटकार पाहून एबीची आठवण झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ –
Mr.360° shot…@imVkohli #viratkholi pic.twitter.com/C9V0EpeC9o
— venkata Chaitanya Mattaparthi (@venkata75310) December 6, 2020
तिसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहलीनं २४ चेंडूत ४० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान दोन उतुंग षटकार आणि दोन खणखणीत चौकार लगावले. विराट कोहली (४०), हार्दिक पांड्या (४२) आणि शिखर धवन (५२) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघानं विजय मिळवला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 6, 2020 6:25 pm