ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी करत आपला धडाकेबाज फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं. कोहलीचं वन-डे कारकिर्दीतलं हे 41 वं शतक ठरलं. सचिन तेंडुलकरचा वन-डे क्रिकेटमधला 49 शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला आता 9 शतकांची गरज आहे. विराटने तिसऱ्या सामन्यात 95 चेंडूत 123 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान विराट कोहलीने सचिनचा आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराटचा आक्रमक फॉर्म कायम, डिव्हीलियर्सला टाकलं मागे

भारतामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट सचिनच्या पुढे निघून गेला आहे. याआधी सचिन तेंडुलकर या यादीमध्ये 7 शतकांसह आघाडीवर होता. याचसोबत 225 वन-डे सामन्यानंतर सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराटने पहिलं स्थान पटकावलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराटची शतकी खेळी व्यर्थ, मात्र अनेक विक्रम केले नावावर

225 वन-डे सामन्यांनतर सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज –

विराट कोहली – 41
हाशिम आमला – 27 (174 वन-डे)
एबी डिव्हीलियर्स – 25
सचिन तेंडुलकर – 23
रोहित शर्मा – 22
सौरव गांगुली – 21

अवश्य वाचा – वन-डे क्रिकेटमध्ये विराट, सचिन आणि लारापेक्षा सर्वोत्तम खेळाडू – मायकल वॉर्न

तिसऱ्या सामन्यात विराटचा अपवाद वगळता भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. विराटने एकाकी झुंज देत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न तोकडेच पडले. 32 धावांनी भारतावर मात करत ऑस्ट्रेलियाने आपली पिछाडी 2-1 ने कमी केली. या मालिकेतला चौथा सामना मोहालीच्या मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – विराटने स्वतःचा खेळ वेगळ्या उंचीवर नेला, प्रशिक्षक बांगर यांच्याकडून कौतुकाची पावती