27 November 2020

News Flash

सेंच्युरिअनच्या मैदानात विराटने घेतले वेडिंग रिंगचे चुंबन

विराटने मॉर्ने मॉर्केलला चौकार ठोकत दिमाखात १५० धावा पूर्ण केल्या.

विराट कोहली

सेंच्युरिअन कसोटीत कर्णधार विराट कोहलीच्या जिगरबाज खेळीने भारतीय संघाला पुन्हा एकदा तारले. पहिल्या डावात आफ्रिकेच्या ३३५ धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था ५ बाद १८२ अशी बिकट झाली होती. मात्र, विराट कोहलीने हार्दिक पंड्या आणि आर. अश्विन यांना साथीला घेत भारतीय संघाचा डाव सावरला. विराटने मॉर्ने मॉर्केलला चौकार ठोकत दिमाखात १५० धावा पूर्ण केल्या. त्यानंतर विराटने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. त्याने दीडशतक पूर्ण झाल्यानंतर आपल्या वेडिंग रिंगचे चुंबन घेतले. या कृतीने त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावरही याची चर्चा रंगली होती.

Ind vs SA 2nd Test Centurion Day 3 Live Updates : बुमराहचा आफ्रिकेला दुहेरी दणका, आमला माघारी

गेल्याच महिन्यात विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबद्ध झाले. तेव्हापासून विराट आणि अनुष्का सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी होते. आफ्रिकेतील पहिल्या कसोटीत विराटला विशेष छाप पाडता आली नव्हती. याशिवाय, दुसऱ्या कसोटीतील संघ निवडीवरूनही त्याच्यावर टीका करण्यात येत होते. मात्र, विराटने आपल्या जिगरबाज फलंदाजीने या सगळ्याला चोख प्रत्युत्तर दिले. १५० धावा पूर्ण झाल्यानंतर विराट मॉर्ने मॉर्कलच्या गोलंदाजीवर लगेच बाद झाला. त्यामुळे भारताचा डाव ३०७ धावांवर आटोपला. मात्र, विराट कोहलीने कालपासून एक बाजू लावून धरल्यामुळे आफ्रिकेला केवळ २८ धावांची नाममात्र आघाडी मिळाली.

‘हिटमॅन’चे धडाकेबाज द्विशतक; पत्नीला दिली लग्नाच्या वाढदिवसाची भेट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 6:06 pm

Web Title: virat kohli special gesture for wife anushka sharma in centurion
Next Stories
1 Australian Open 2018 – भारताच्या युकी भांबरीचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात
2 दुसऱ्या डावात बुमराहचे आफ्रिकेला दणके, मात्र पाऊस-अंधुक प्रकाशाने सामन्याचा खेळखंडोबा
3 ग्रँड स्लॅम स्पर्धाचा कालावधी कमी हवा
Just Now!
X