News Flash

फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली अग्रस्थानावर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एकूण ३४४ धावा करणाऱ्या विराट कोहलीने जागतिक एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतील

| November 4, 2013 02:52 am

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एकूण ३४४ धावा करणाऱ्या विराट कोहलीने जागतिक एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतील फलंदाजांच्या विभागात अग्रस्थानावर झेप घेतली आहे. कोहलीने पुण्यात ६१, जयपूरला नाबाद १००, मोहालीत ६८, नागपूरमध्ये नाबाद ११५ आणि बंगळुरूला ० धावा काढल्या. २४ वर्षीय कोलीने ११४.६६च्या सरासरीने धावा काढून ३८ गुण मिळवत क्रमवारीत आघाडीचे स्थान मिळवले आहे. कोहलीने  प्रथमच ही मजल मारली आहे. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीनंतर कोहली हा जागतिक फलंदाजीच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारा तिसरा खेळाडू ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 2:52 am

Web Title: virat kohli stands top in batting ranking
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 यादव, वायंगणकर आणि मराठे मुंबईच्या संघात
2 अर्सेनलची जेतेपदाच्या दिशेने कूच
3 रोनाल्डोचा दुहेरी धमाका!
Just Now!
X