News Flash

वनडे रँकिंगमध्ये विराट अव्वल, ऋषभचीही ‘मोठी’ भरारी

जसप्रीत बुमराहची घसरण

ऋषभ पंत आणि विराट कोहली

आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. आज बुधवारी आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 56 आणि 66 धावा काढलेल्या कोहलीच्या खात्यात 870 गुण आहेत.

भारताचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा तिसर्‍या क्रमांकावर असून तो पाकिस्तानच्या बाबर आजमच्या मागे आहे. तर, केएल राहुलने 31व्या स्थानावरुन 27व्या स्थानावर झेप घेतली आहे.

अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 42वे स्थान मिळवले असून ऋषभ पंतने पहिल्या 100 फलंदाजांमध्ये मध्ये प्रवेश केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करेल.

गोलंदाजांची क्रमवारी

इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेमधून विश्रांती घेतलेला बुमराह गोलंदाजांमध्ये चौथ्या स्थानावर घसरला आहे. त्याच्या खात्यात 690 गुण आहेत. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 42 धावा देऊन 3 फलंदाज बाद करणाऱ्या भूवनेश्वर कुमारने गोलंदाजांमध्ये 11व्या स्थानी उडी घेतली आहे. 10 सप्टेंबर 2017 नंतरची ही भूवनेश्वर कुमारची सर्वोत्तम कामगिरी आहे. पालघर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा शार्दुल ठाकूर 80व्या स्थानी पोहोचला आहे. शार्दुलने इंगलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 67 धावांत 4 फलंदाजांना माघारी धाडले होते.

 

टी-20 क्रमवारी

फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत राहुल आणि कोहली अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे. अष्टपैलू आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत एकही भारतीय खेळाडू अव्वल दहा जणांमध्ये नाही.

कसोटीत अश्विन दुसऱ्या स्थानी

कसोटी क्रमवारीत फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स नंतर दुसरे स्थान कायम राखला आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा तिसऱ्या तर, अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 4:32 pm

Web Title: virat kohli stays on top of icc odi ranking adn 96
Next Stories
1 आयपीएलमध्ये ‘हा’ नियम मोडला की, कर्णधारच होणार ‘आऊट’!
2 VIDEO: चहलच्या बायकोचा ‘गब्बर’सोबत भन्नाट डान्स!
3 ऋषभ पंतला दिल्लीचा कर्णधार केल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणतो….
Just Now!
X