30 March 2020

News Flash

विराटने दिले संकेत… चाहत्यांना बसू शकतो ‘या’ विधानामुळे धक्का!

"प्रत्येकाची एक मर्यादा असते. कधी ना कधी..."

भारताचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या कामगिरीतील सातत्यामुळे सदैव चर्चेत असतो. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हणून पावती दिली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक क्रमवारीतही त्याने अव्वल स्थान कायम राखत स्वत:ला सिद्ध केले आहे. मात्र पुढील तीन वर्षांनंतर विराट आपल्या क्रिकेट कारकिर्दीबाबत गांभीर्याने विचार करणार असून तीन पैकी एका प्रकारात निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

२०२१ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेनंतर तू क्रिकेटच्या एखाद्या फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा विचार करतो आहेस का? असा सवाल विराटला करण्यात आला. त्यावर विराट म्हणाला, “सध्या तरी मी पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी स्वत:ला तयार करतो आहे. क्रिकेटच्या मैदानात आपण दमदार कामगिरी करत राहावी यासाठी मी सध्या केवळ पुढील तीन वर्षांचाच विचार करतो आहे. तीन वर्षानंतर मात्र कदाचित आपण काही वेगळ्या पद्धतीचा संवाद साधू शकतो.”

असा विषय तुम्ही कोणापासूनही लवपून ठेवण्यासारखा नाही. आता जवळपास गेले ८ वर्षे मी वर्षातील ३०० दिवस मैदानावर क्रिकेट खेळतो आहे. त्यात प्रवास आणि सराव सत्रे देखील आलीच. आणि प्रत्येक वेळी मी माझे १०० टक्के प्रयत्न करत असतो. पण प्रत्येकाची शारीरिक ताण सहन करण्याची एक मर्यादा असते. त्यामुळे आता तरी मी तीन वर्षे तीनही प्रकारचे क्रिकेट खेळणार आहे, पण नंतर मात्र कदाचित मी वेगळा निर्णय घेऊ शकतो.

“सहसा तीनही प्रकारचे क्रिकेट खेळणाऱ्यांच्या बाबतीत असे घडते. शारीरिक ताण आणि विश्रांती याबाबत खेळाडू कायम विचार करत असतात. काही वेळा वेळापत्रक संमती देत नसेल तरी आम्ही वैयक्तिक पातळीवर काही वेळा विश्रांतीचा निर्णय घेतो. तशातच कर्णधार म्हणून इतके सामने खेळणे सोपे नसते. सराव सत्रांपासून नेतृत्वाची जबाबदारी जाणवायला लागते. त्यामुळे ठराविक कालांतराने विश्रांती घेणे मला स्वत:ला पटते”, असेही विराटने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 1:29 pm

Web Title: virat kohli talks about retirement from cricket workload tells 3 years plan vjb 91
Next Stories
1 सचिनचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
2 IPL 2020 : राजस्थान संघातील खेळाडूच्या कारला मोठा अपघात; कारचा चक्काचूर
3 डोकं फुटेल… विराटचा फोटो वापरून पोलिसांनी दिला इशारा
Just Now!
X