22 September 2020

News Flash

विराटने तोंडावर सांगितली होती ‘ही’ गोष्ट – पाकिस्तानी खेळाडू

'तो' खेळाडू पहिल्यांदाच आला होता भारत दौऱ्यावर

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय तणाव शांत होण्याची चिन्हे नाहीत. त्याचसोबत यांच्यात क्रिकेट मालिका होण्याचीही शक्यता नाही. पाकिस्तानचे काही आजी-माजी खेळाडू मधल्या काळात भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवून करोनाग्रस्तांना मदत करण्याचा प्रस्ताव मांडत होते. पण भारतीय खेळाडूंनी त्याला थेट नकार दिला. पण जेव्हा भारत-पाक यांच्या क्रिकेट मालिका खेळल्या जायच्या, तेव्हा अनेक मजेदार किस्से घडायचे. असाच एक किस्सा पाकिस्तानचा ७ फूट उंच असलेला गोलंदाज मोहम्मद इरफान याने सांगितला.

इरफानने युट्यूब चॅट शो ‘क्रिककास्ट’वर बोलताना सांगितलं, “मी जेव्हा पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर गेलो, तेव्हा भारतीय खेळाडू मला सांगत होते की त्यांचे प्रशिक्षक आणि सहाय्यक यांनी भारतीय खेळाडूंना सांगितले होते की मी फक्त १३०-१३५ किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करतो. विराट कोहलीनेसुद्धा मला तोंडावर सांगितले होतं की त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला सांगितले होते की मी फक्त १३०-१३५ किमी प्रति तास वेगवान गोलंदाजी करतो. मी फक्त उंच आहे, त्यामुळे मला बाऊन्स मिळेल पण वेग मात्र फारसा नसेल”

“जेव्हा विराट पॅड्स लावून बसला होता, तेव्हा त्याने पाहिले की मी पहिला चेंडू १४५-१४६ किलोमीटर प्रतितास वेगाने फेकला. त्याला वाटलं की स्पीड गनमध्ये काही अडचण आहे. मग मी पुढचा चेंडू १४७ किलोमीटर वेगाने टाकला. त्यानंतर त्याने आपल्या प्रशिक्षकाला विचारले की तो खोटं बोलत आहे की स्पीड गनमध्ये काही समस्या आहे. त्यापुढचा चेंडू मी १४८ किमी प्रति तास वेगाने टाकल्यावर तर त्याने बाजूला असलेल्या शिव्या दिल्या आणि विचारलं की १५० किमीच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्याला तुम्ही मध्यमगती म्हणता का? माझ्यासमोर हा प्रसंग घडला होता”, असंही इरफानने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 11:39 am

Web Title: virat kohli told me his on my face about bowling speed says pakistani cricketer mohammad irfan ind vs pak vjb 91
Next Stories
1 IPL 2020 : आनंदाची बातमी! ‘टीम इंडिया’च्या खेळाडूची करोनावर मात
2 “मी तुला पंतप्रधान बनवलं अन् आता…”; मियाँदाद-इम्रान खान यांच्यात खडाजंगी
3 ‘बीसीसीआय’चे ‘अर्थलक्ष्य’
Just Now!
X