28 February 2021

News Flash

“विराटची गर्लफ्रेंड त्याची ओळख ‘एक्स-बॉयफ्रेंड’ म्हणून करून द्यायची”

इंग्लंडच्या क्रिकेटरने सांगितला जुना किस्सा

इंग्लंडच्या २०१२ साली झालेल्या भारत दौऱ्यात पाहुण्या संघाच्या एका खेळाडूने विराटला मैदानावर स्लेजिंग करून खूप त्रास दिला होता. तो खेळाडू होता इंग्लंडचा माजी फलंदाज निक कॉम्पटन. मैदानावर विराटला सारखं डिवचून बोलणाका हा खेळाडू विराटवर टीका केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कॉम्पटनने एज आणि स्लेजेस क्रिकेट पॉडकास्टमध्ये २०१२ सालच्या भारत दौऱ्याची एक आठवण सांगितली. या आठवणीदरम्यान निक कॉम्प्टनने विराटची एक्स गर्लफ्रेंड असलेली इजाबेल हिच्याबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केलं.

“मी विराटच्या गर्लफ्रेंडशी (इसाबेलशी) अनेकदा बोलायचो, पण ते विराटला अजिबात आवडत नव्हतं. मग विराट फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला की मी नेहमी त्याला त्याच्या गर्लफ्रेंडच्या विषयावरून डिवचायचो. त्यामुळे तो माझ्यावर चिडायचा आणि बचावात्मक खेळ करायचा. विराटची बॅट मैदानावर शांत करण्यासाठी या मुद्द्याचा आम्ही खूप वापर केला. पण विशेष म्हणजे कोहलीला वाटायचं की आम्ही त्याच्या गर्लफ्रेंडसोबत कायमच बोलत असतो. तसं अजिबातच नव्हतं. पण एक गोष्ट मात्र घडली होती, ती म्हणजे मी फलंदाजीसाठी मैदानावर गेलो की विराट मला सांगायचा की ती त्याची गर्लफ्रेंड आहे, पण ती मात्र आमच्याशी बोलताना विराट माझा एक्स बॉयफ्रेंड होता, असं सांगायची”, असा खुलासा कॉम्प्टनने केला.

“सुरूवातीला आम्ही या साऱ्या गोष्टींची मजा घ्यायचो. विराटला चिडवून आम्ही त्याचे फलंदाजीवरील लक्ष विचलित करायचा प्रयत्न करायचो. पण त्याने आम्हाला बॅटने चांगलेच प्रत्युत्तर देत शतक झळकावले होते”, असेही कॉम्प्टनने स्पष्ट केले.

दरम्यान, २०१२ साली इंग्लंड भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा दोन्ही संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका झाली. या मालिकेत भारत २-१ अशा फरकाने पराभूत झाला. अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ९ गडी राखून विजय मिळवत भारताने चांगली सुरुवात केली होती. पण मुंबई येथे झालेला दुसरा कसोटी सामना भारताने १० गड्यांनी गमावला होता. कोलकाता येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडने ७ गडी राखून विजय मिळवला होता. तर, नागपूर कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. पण त्यात विराटने शतक ठोकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 7:05 pm

Web Title: virat kohli told us she was his girlfriend but she was saying he was her ex boyfriend reveals england cricketer nick compton vjb 91
Next Stories
1 कर्णधार म्हणून विराटने अद्याप काहीही साध्य केलं नाही – गौतम गंभीर
2 क्रिकेट मालिका आणि ICC च्या स्पर्धा यांच्यात ‘हा’ फरक – गंभीर
3 सुशांतच्या मृत्यूवर शोएब अख्तर म्हणतो…
Just Now!
X